आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan\'s Sister Arpita\'s Wedding Held In Falaknuma Palace

सलमानच्या बहिणीच्या लग्नात जगातील सर्वात मोठ्या डायनिंग टेबलवर पाहुण्यांनी केले जेवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फलकनुमा पॅलेस आणि जगातील सर्वात मोठा डायनिंग टेबल)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या लग्नामुळे हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेस चर्चेत आहे. हे पॅलेस अनेक गोष्टींमुळे खास आहे.
फलकनुमा पॅलेस आपल्या विशिष्ट बनावट, लोकेशन आणि अद्भूत शिल्पामुळे ताज ग्रुप्स ऑफ हॉटेलच्या शानदार हॉटेल्सपैकी एक आहे. असे म्हटले जाते, की अभिनेत्री दीया मिर्झाची फलकनुमा पॅलेसमध्ये लग्न करायची इच्छा होती, मात्र हे हॉटेल खूप महागडे असल्यामुळे तिने शेवटच्या क्षणी आपले लग्नस्थळ बदलले.
फलकनुमा पॅलेस हैदराबादमधील उंच ठिकाणी असून तेथून शहराचे दर्शन घडले. 32 एकर क्षेत्रात पसरलेले हे पॅलेस चारमिनारपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे. फलकनुमा पॅलेसची निर्मीती नवाब विकार उल उमर यांनी केली होती. फलकनुमाचा अर्थ 'आकाशाप्रमाणे' असा होतो.
2010 मध्ये ताज ग्रुप्स ऑफ हॉटेलने घेतले लीजवर...
2010मध्ये ताज ग्रुप्स ऑफ हॉटेल्सने हे पॅलेस निझाम फॅमिलीकडून 30 वर्षांसाठी लीजवर घेतले आहे. त्यांनी फलकनुमा पॅलेस लग्झरी हॉटेलमध्ये परिवर्तित करुन नोव्हेंबर 2010 पासून लोकांसाठी सुरु केले. या पॅलेसमधील खोल्या आणि भिंतींना फ्रान्समधून मागवण्यात आलेल्या ओर्नेट फर्निचर, अनेक सुंदर हस्तशिल्प कलाकृती आणि ब्रोकेडने सजवण्यात आले आहे. या पॅलेसमध्ये 101 लोकांची क्षमता असलेला डायनिंग हॉल आहे. हा जगातील सर्वात मोठा डायनिंग हॉल असल्याचे म्हटले जाते. 108 फूट लांबीच्या या टेबलला सोने आणि क्रिस्टलने सजवण्यात आले आहे.
फलकनुमा पॅलेस ब्रिटीश आर्किटेक्टने डिझाइन केले आहे. या पॅलेसचे बांधकाम 3 मार्च 1884 रोजी सुरु करण्यात आले होते. नवाब सर विकार उल उमर यांनी याची निर्मिती सुरु केली होती. नवाब विकार उल उमर, खुद्दस यांचे नातू होते. खुद्दस एक सायंटिस्ट होते. पॅलेस तयार व्हायला तेरा वर्षांचा काळ लागला होता.
सर विकार होते येथे वास्तव्याला...
सर विकार या पॅलेसमध्ये काही वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर हे पॅलेस 1897-98च्या काळात हैदराबादचे सहावे निझाम मीर महबूब यांना सोपवण्यात आले होते. या पॅलेसच्या निर्मितीवर अफाट खर्च करण्यात आला होता. सर विकार यांच्या पत्नी उल उमरा यांच्या सल्ल्यावरुन त्यांनी हे पॅलेस निजाम यांना भेट म्हणून दिले. निझामांनी या पॅलेसचा अतिथीगृहाच्या रुपात वापर सुरु केला. 1950मध्ये निझामकाळ समाप्त झाल्यानंतर हे पॅलेस बंद करण्यात आले होते. मात्र ही संपत्ती निझामांच्या कुटुंबीयांकडे राहिली.
सर्वात मोठा डायनिंग टेबल...
या पॅलेसमध्ये एक बिलियडर्स रुम आहे. या पॅलेसमधील डायनिंग टेबल अतिशय आकर्षक आहे. असे म्हटले जाते, की अशा दोनच टेबलची निर्मिती करण्यात आली आहे, त्यापैकी एक टेबल ब्रिटनच्या महाराणीच्या बर्किंघम पॅलेसमध्ये आहे.
फलकनुमामध्ये आहेत 220 खोल्या, 60 आहेत ताजकडे..
फलकनुमा पॅलेसमध्ये एकुण 220 खोल्या असून त्यापैकी 60चा ताबा ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सकडे आहे. फलकनुमा पॅलेसचा एक मोठा भाग बंद ठेवण्यात आला आहे. ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सकडे असलेल्या 60 खोल्यांमध्ये डायनिंग हॉल, पॅलेस रुम्स, हिस्टोरिकल सुएट, रॉयल सुएट, ग्रँड सुएट आणि ग्रँड प्रेजिडेंशियल सुएट आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा भव्य फलकनुमा पॅलेसची निवडक छायाचित्रे...