आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: 8 मिनिटांत काढल्या 'धूम 3'च्या 138 MISTAKES, 'जय'ला सांगितले मुर्ख कॉप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('धूम 3'चे पोस्टर)
मुंबईः बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेले 'धूम' सीरिजचे सिनेमे लार्जन दॅन लाइफ फ्रेम्स, कंटेंट आणि अॅक्शनसाठी ओळखले जातात. आता या सीरिजशी निगडीत एक गंमतीशीर बाब समोर आली आहे.
एका व्यक्तीने 'धूम 3' या सिनेमातील तब्बल 138 चुका केवळ आठ मिनिटांमध्ये सांगितल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चुकांकडे प्रेक्षकांचे अनेकदा लक्ष गेले, मात्र त्या चुका लक्षात आल्या नाहीत. '3S' नावाच्या व्हिडिओ चॅनलने यूट्युबवर हा खास व्हिडिओ अपलोड केला आहे.
या आठ मिनिटांच्या व्हिडिओत सिनेमातील चुका दृश्यांच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. हा स्पूफ व्हिडिओ गमतीशीर असून एखाद्या शॉर्ट फिल्मसारखा भासतो. धूम सीरिजच्या सर्व सिनेमांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत झळलेल्या अभिषेक बच्चनला मुर्ख कॉप म्हटले आहे. तर अली (उदय चोप्रा)च्या अनेक सीन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा हा 'धूम 3' मधील तब्बल 138 चुका अधोरेखित करणारा गमतीशीर व्हिडिओ...