आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Movie Posters, Which Has Already Gathered Headlines

कधी बोल्डनेसमुळे तर कधी वादांमुळे, या 17 मुव्ही पोस्टर्सनी एकवटली आहे चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('रागिनी एमएमएस-2'चे पोस्टर)
मुंबई - प्रियांका चोप्रा स्टारर 'मेरी कोम' या सिनेमाचा पोस्टर अलीकडच्याच काळात रिलीज करण्यात आला आहे. प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा येत्या 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर कळेल. मात्र या सिनेमाच्या पोस्टरची सध्या बरीच चर्चा होत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, पोस्टरवर प्रियांकाचे मसल्स दिसत आहेत. हे मसल्स कसे बनवले, असा प्रश्न प्रियांकाचे चाहते तिला ट्विटरवरुन विचारत आहेत. एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रियांकाने सांगितले, की दोन वर्षांच्या ट्रेनिंगची ही कमाल आहे.
प्रियांकाने मेरी कोमचे आयुष्य पडद्यावर जिवंत करण्यासाठी केवळ बॉक्सिंगचे धडेच गिरवले नाही, तर बॉडीसाठी कठोर वर्कआउटसुद्धा केले आहे. संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या या सिनेमात प्रियांकासह डॅनी डेन्जोंगपा, मीनाक्षी कलिता, जचारी कॉफिन आणि शिशिर शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रियांका स्टारर 'मेरी कोम' या सिनेमाचा पोस्टर प्रियांकाच्या मसल्समुळे चर्चेत आले आहे. याचप्रकारे बी टाऊनमधील सिनेमांचे अनेक पोस्टरसुद्धा यापूर्वी चर्चेत आले आहेत. काही पोस्टर्स त्याच्या बोल्डनेसमुळे तर काही कॉन्ट्रोव्हर्सीजमुळे चर्चेत आले. एक नजर टाकुया अशाच काही निवडक पोस्टर्सवर...
फिल्मः रागिनी MMS 2

दिग्दर्शक - भूषण पटेल
निर्माती - एकता कपूर
कलाकार - सनी लियोनी, साहिल प्रेम, संध्या मृदुल
संगीत - हनी सिंह
नोट - सनी लियोनच्या या सिनेमाचे पोस्टर बरेच चर्चेत होते. याचे कारण पोस्टरवर दाखवण्यात आलेली सनीची न्युडिटी आणि 'दो में ज्यादा मजा है' हे लिहिण्यात आलेले कोट होते. सनीने पोर्न स्टारच्या रुपात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे तिच्यासाठी हे नवीन नव्हते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कॉन्ट्रोव्हर्शिअल आणि बोल्ड पोस्टर्सची एक झलक...