आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘2 स्टेट्स’चे न्यू कव्हर लाँच, आलिया-अर्जुनची दिसली जबरदस्त केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपल्या आगामी ‘2 स्टेट्स’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्माते-दिग्दर्शक नवनवीन क्लुप्त्या अंमलात आणत आहेत. मुंबईत अलीकडेच चेतन भगतच्या ‘2 स्टेट्स’ या कादंबरीचे नवीन कव्हरपेज लाँच करण्यात आले. कादंबरीचे नवीन कव्हरपेज लाँच करणे, हे आलिया-अर्जुनच्या सिनेमाच्या प्रमोशनचाच एक भाग होता. ‘2 स्टेट्स’ या नॉवेलच्या नवीन कव्हरपेजवर ‘2 स्टेट्स’ या सिनेमातील कलाकार दिसत आहेत. या पोस्टरवर आलिया, अर्जुन आणि त्यांचे कुटुंब दिसत आहे.
‘2 स्टेट्स’चे नवीन कव्हरपेज आलिया आणि अर्जुनच्या हस्ते लाँच करण्यात आले. यावेळी चेतन भगत आणि त्यांची पत्नी अनुषा भगत उपस्थित होते. या कार्यक्रमात आलिया आणि अर्जुनची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली. दोघेही यावेळी एकमेकांची विशेष काळजी घेताना दिसले. कव्हरपेज लाँचवेळी आलिया ब्लू ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिलत होती. यावेळी ती खूप मेकअपसुद्धा केला नव्हता.
आलिया-अर्जुन स्टारर ‘2 स्टेट्स’ हा सिनेमा रोमँटिक ड्रामा आहे. सिनेमाची कथा चेतन भगतच्या ‘2 स्टेट्स’ या कादंबरीवर आधारित आहे. अभिषेक वर्मन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर साजिद नाडियाडवाला आणि करण जोहर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. ‘2 स्टेट्स’ मध्ये आलिया आणि अर्जुन यांच्यासह रोनित रॉय, अमृता सिंह, रेवती आणि अंकित चित्राल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या 18 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ‘2 स्टेट्स’च्या न्यू कव्हरपेज लाँचदरम्यान क्लिक झालेली छायाचित्रे...