आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमारा, आराध्या, अबराम, जाणून घ्या बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची ही नावे का ठेवली?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता इमरान खान पत्नी अवंतिका आणि मुलगी इमारासह...
मुंबई - अभिनेता इमरान खान अलीकडेच बाबा झाला आहे. त्याला 9 जून 2014 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. इमरान आणि अवंतिका मलिकने आपल्या या लाडक्या लेकीचे नाव इमारा असे ठेवले आहे. इमाराच्या आडनावासोबत इमरान आणि अवंतिकाचे आडनाव जोडण्यात आले आहे. म्हणजेच इमरानच्या मुलीचे पूर्ण नाव इमारा मलिक खान असे आहे.
इमरानने इमाराचा अर्थ मजबूत आणि धाडसी असा सांगितला आहे. त्याने पुढे सांगितले, की हे नाव ठेवावे की नाही या द्विधा मनःस्थितीत आम्ही होतो. कारण इमारा हे नाव ऐकायला थोडं अंहकारपूर्ण वाटतं. मात्र नंतर कोणतेच नाव पसंत न पडल्यामुळे आम्ही मुलीचे नाव इमारा ठेवले, असे तो म्हणाला.
खरं तर नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. व्यक्तिची खरी ओळख त्याच्या कामाने होते. शेक्सपिअरचे म्हणणे खरे आहे. मात्र आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या असो किंवा शिल्पा-राजचा मुलगा वियान... प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ नक्की आहे. इमरानच्या मुलीच्या नावाचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगितला आहेच.
आज आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील 20 सेलेब्स आणि त्यांच्या मुलांची छायाचित्रे दाखवत आहोत. त्यासोबतच या सेलेब्सच्या मुलांच्या नावाचा अर्थही सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊन स्टार्सच्या लाडक्या मुलांच्या नावाचा अर्थ...