आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीणाने बाळाचे नाव ठेवले 'अबराम', जाणून घ्या 20 बॉलिवूड स्टार्सच्या मुलांच्या नावाचा अर्थ काय आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः वीणा मलिक, शेजारी वीणाचे पती असद आपल्या बाळासोबत)

मुंबई - बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. वॉशिंग्टन डीसी (USA) मधील एका खासगी रुग्णालयात वीणाने आज गोंडस बाळाला जन्म दिला. वीणा आणि तिचे पती असद बशीर खान यांनी आपल्या लाडक्या मुलाचे नाव 'अबराम' असे ठेवले आहे. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचेसुद्धा हेच नाव आहे.
असद यांनी आपले बाळासोबतचे छायाचित्र ट्विटरवरुन पोस्ट करुन ट्विट केले, "Alhumdullilah we are blessed with a Baby Boy @iAbramKhan... cute son of Proud father @Asadbashirr". वीणाच्या बाळाचे नाव 'अबराम' हे हिब्रूमधून घेण्यात आले आहेत. या नावाचा अर्थ सर्वात उंच वडील असा होतो.
खरं तर नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. व्यक्तीची खरी ओळख त्याच्या कामाने होते. शेक्सपिअरचे म्हणणे खरे आहे. मात्र आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या असो किंवा शिल्पा-राजचा मुलगा
वियान... प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ नक्की आहे.
वीणा मलिकच्या मुलाच्या नावाचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगितला आहेच. आता आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील 20 सेलेब्स आणि त्यांच्या मुलांची छायाचित्रे दाखवत आहोत. त्यासोबतच मुलांच्या नावाचा अर्थही सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊन स्टार्सच्या लाडक्या मुलांच्या नावाचा अर्थ...