आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो-हिरोईनने केले एकमेकांना 33 वेळा KISS, तेव्हा OK झाला शॉट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुभाष घईंच्या ‘कांची’ या महत्वाकांक्षी चित्रपटामधील एका किसींग सीनसाठी नवोदित कलाकार मिष्ठी आणि कार्तिक यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 33वेळा रिटेक्स दिले आहेत. सीन परफेक्ट होण्यासाठी इतके रिटेक्स क्वचितच कुठल्या कलाकारांना द्यावे लागले असतील.
मिष्ठी मुखर्जी आणि कार्तिक तिवारी यांचा हा पहिलाच बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये दोघांची केमिस्ट्री जुळण्याकरता घई अत्यंत कठोर परिश्रम घेत आहेत. मात्र चित्रीकरणाव्यतिरिक्तही मिष्ठी व कार्तिक एकमेकांबरोबर वेळ घालवत असल्याची चर्चा आहे. काहीही असो पण एका किसिंग सीनकरता दोघांनी दिलेले 33 रिटेक्स म्हणजे त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीची परीक्षाच घईंनी घेतली आहे.
या दोघांव्यतिरिक्त 'कांची'मध्ये ऋषी कपुर आणि मिथून चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. ग्रामीण भागातील मुलगी आणि तिचा न्यायासाठी लढा असे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथानक आहे. मिष्ठीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी कार्तिकपाशी या पहिल्या बिग बजेट चित्रपटाव्यतिरिक्त ‘प्यार का पंचनामा’, ‘आकाशवाणी’ यासारख्या लो बजेट चित्रपटांचा अनुभव आहे. आता विसलिंग वुड फिल्म युनिव्हर्सिटीच्या वादात मध्यंतरी अडकलेल्या घईंचा हा 'कांची' चित्रपट किती यशस्वी ठरेल ठाऊक नाही पण 33 रिटेक्स दिलेला किसींग सीन कसा असेल याची मात्र प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मिष्ठीचे खास PICS....