आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक नवनवीन कल्पना कायम लढवत असतात. अशीच एक भन्नाट युक्ती ‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटाच्या चमूने शोधून काढली आहे. या चित्रपटातील एका गाण्यात तब्बल 44 मराठी चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी कमल हसनच्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील ‘मेरे जीवनसाथी...’ या गाण्यात असाच उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता मराठीत हा प्रयोग किती यशस्वी होतो हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटात ‘लपवाछपवी’, ‘फसवाफसवी’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘पोरीचा मामला’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘धुडगूस’, ‘हल्लागुल्ला’ ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’... असे धृपद असलेले हे गाणे गीतकार राजेश बामुगडे यांनी लिहिले असून अशोक वायंगणकर यांनी संगीतबद्ध केले आहे. अवधूत गुप्ते आणि नेहा राजपाल यांनी स्वरबद्ध केले आहे. नीलेश साबळे आणि हेमलता बाणे यांच्यावर हे धमाल गीत चित्रित करण्यात आले आहे. तमन्ना नायर, विजू खोटे, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, सतीश तारे, मृण्मयी देशपांडे, शर्मिष्ठा राऊत, गिरिजा ओक, अदिती सारंगधर, भार्गवी चिरमुले आणि सोनाली खरे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.
गाण्यातील 44 चित्रपट
‘दे दणादण’, ‘जबरदस्त’, ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘इश्श’, ‘नाथा पुरे आता’, ‘गडबड घोटाळा’, ‘यांचा काही नेम नाही’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘लपवाछपवी’, ‘फसवाफसवी’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘पोरीचा मामला’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘धुडगूस, ‘हल्लागुला’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘अगंबाई अरेच्चा’, ‘छक्केपंजे’, ‘सांगत्ये ऐका’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘लपंडाव’, ‘जाऊ तिथं खाऊ’, ‘खिचडी’, ‘मुका घ्या मुका’, ‘श्वास’, ‘झपाटलेला’, ‘गोलमाल’, ‘मसाला’, ‘कायद्याचं बोला’, ‘फेकाफेकी’, ‘अफलातून’, ‘सोंगाड्या’, ‘गंमत जंमत’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘फटाकडी’, ‘गुलछडी’, ‘माहेरची साडी’, ‘खबरदार’, ‘टिवल्याबावल्या’, ‘बिनधास्त’, ‘लाडीगोडी’.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.