आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FRIDAY FEVER: 5 छोटे सिनेमे घेणार मोठी रिस्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी कमी बजेट आणि सरासरीच्या कलाकारांचे पाच सिनेमे थिएटरमध्ये दाखल होत आहेत. मीकासिंग आणि शानचा 'बलविंदर सिंह फेमस हो गया', सोहा अली खानचा 'चार फुटिया छोकरे', सुनील शेट्टी अभिनीत 'देसी कट्टे', रणविजय सिंहचा '3 एएम' आणि रघुबीर यादवचा 'मैनू एक लडकी चाहिए' हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत.
मागील पाच वर्षांमध्ये टियर-2 आणि 3 शहरांत मल्टीप्लेक्स सतत बनवत आहेत. त्यामुळे स्क्रिनमध्ये वाढ होत आहे. सिनेमा निर्मातीतसुध्दा नवख्या लोकांची एंट्री होत आहे. त्यांची कमकुवत बाजू म्हणजे, 3 ते 5 कोटींच्या सिनेमांचा प्रचार करणे त्यांना परवडत नाही. परंतु त्यांना मोठ्या सिनेमांसह रिलीज होण्यास संधी मिळते.
आजकाल प्रिन्ट प्रमोशनमध्ये कमीत-कमी 5 कोटींचा खर्च येतो. या आठवड्यात पाच सिनेमे जवळपास सहा दिवसांत नशीब आजमवणार आहेत. वर्षांचा सर्वात मोठा वीकेंड अर्थातच 2 ऑक्टोबर रोजी शाहिद-श्रध्दा कपूर अभिनीत विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'हैदर' आणि हृतिक-कतरिना अभिनीत 'बँग बँग' हे मोठ्या बजेटचे सिनेमे रिलीज होत आहे. कालपासून नवरात्री सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांची ओढ दांडिया आणि भव्य कार्यक्रमांकडे दिसून येईल.
संपूर्ण भारतात 26 सप्टेंबर रोजी हे सिनेमे 350 ते 800 स्क्रिनवर रिलीज होत आहेत. मात्र काही शहरांत यापैकी एकच सिनेमा रिलीज होऊ शकतो. त्या ठिकाणी 'दावत-ए-इश्क', 'खुबसुरत', 'मेरी कोम' आणि 'मर्दानी'चे शो अजूनही चालूच आहेत. 10 ऑक्टोबर रोजीसुध्दा अशीच परिस्थिती राहणार आहे. त्या शुक्रवारीसुध्दा रिचा चड्डाचा 'तमंचे', नेहा धूपियाचा 'इक्कीस तोपो की सलामी', 'जिगरिया' आणि 'स्पार्क' सिनेमे प्रदर्शित होत आहेत.
सिनेमा पंडित या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवरील यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. दिवाळीच्या 15 दिवसांपूर्वीच्या या कालावधीत सिनेमे रिलीज करणे सुरक्षित मानले जात नाहीये. कमी बजेटच्या सिनेमांमध्ये 50पैकी 1 सिनेमा यशस्वी होण्याचा शक्यता आहे.
त्यासाठीसुध्दा दमदार कास्टिंग आणि हिट म्युजिक गरजेचे आहे. 26 सप्टेंबर आणि 10 ऑक्टोबर या दोन आठवड्यात 'तमंचे, '3 एएम', 'देसी कट्टे' आणि मीकासिंगचा सिनेमा ठिका-ठाक चालू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.