आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Anni: 3 दशके बॉलिवूडवर गाजवले अधिराज्य, रेखासोबतचे अफेअर होते चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः विनोद मेहरा आणि रेखा)
मुंबईः हिंदी सिनेमात सुरुवातीपासून चॉकलेट हीरोंना विशेष डिमांड राहिली आहे. अशाच अभिनेत्यांमध्ये एक विनोद मेहरासुद्धा होते. बॉलिवूडमध्ये चॉकलेट हीरो म्हणून नावारुपास आलेल्या विनोद मेहरा यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1945 रोजी लाहोरमध्ये झाला होता. त्यांनी जवळजवळ तीन दशके बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. अभिनेत्यापूर्वी ते बालकलाकार म्हणून 'रागिनी' (1958) या सिनेमात पहिल्यांदा झळकले होते. शुक्रवारी विनोद मेहरा यांची 70वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. यानिमित्ताने एक नजर टाकुया त्यांच्या आयुष्यातील 10 खास गोष्टींवर..
1.. विनोद मेहरा यांनी 1958 मध्ये पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. 'रागिनी' या सिनेमात त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. आय. एस. जोहर यांच्या 'बेवकूफ' (1960) आणि विजय भट्ट यांच्या 'अंगुलिमाल' (1960) या सिनेमांतही त्यांनी छोटेखानी भूमिका साकारल्या होत्या.
2.. 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'एक थी रीटा' या सिनेमातून विनोद मेहरा आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. या सिनेमात तनुजा त्यांची नायिका होती.
3.. विनोद मेहरा यांची ऑन स्क्रिन जोडी अभिनेत्री मौसमी चॅटर्जीसोबत जमली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. शक्ती सामंत यांच्या 'अनुराग' (1972) या सिनेमात मौसमी आणि विनोद पहिल्यांदा एकत्र झळकले. त्यानंतर 'उस पार' (बसु चटर्जी), 'दो झूठ' (जीतू ठाकुर) आणि 'स्वर्ग नरक' (दसारी नारायण राव) या सिनेमांतील विनोद आणि मौसमी ही जोडी झळकली.
4.. विनोद यांना ए ग्रेड नव्हे तर बी ग्रेड सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. कारण मोठ्या दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमात सेकंड लीड हीरोच्या रुपात पसंती दिली होती.
5.. सिनेमांसोबतच विनोद मेहरा खासगी आयुष्यात आपल्या अफेअर्समुळे चर्चेत राहिले. विनोद मेहरा यांनी तीन लग्ने केली. मीना ब्रोका हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते. त्यानंतर विवाहित विनोद मेहरा यांचे बिंदिया गोस्वामीसोबत सूत जुळले. याकाळात हे दोघे एकत्र काम करत होते. विनोद मेहरांनी बिंदियासोबत दुसरा संसार थाटला. मात्र फार काळ त्यांचे लग्न टिकले नाही.
6.. बिंदियापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी किरण नावाच्या तरुणीसोबत तिसरे लग्न केले. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे सोनिया आणि रोहन ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. सोनिया मेहराने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
7.. विनोद मेहरा आणि रेखा यांच्या जवळीक आणि रोमान्सच्या चर्चा अनेक दिवस बॉलिवुडमध्ये रंगल्या. असे म्हटले जाते, की दोघांनी लग्नदेखील केले होते. मात्र सत्य काय हे कुणालाही ठाऊक नाही.
8.. विनोद मेहरा यांच्या करिअरमधील अविस्मरणीय सिनेमांविषयी बोलायचे झाल्यास, 'अनुराग' (1972), 'नागिन' (1976), 'अनुरोध' (1977), 'साजन बिना सुहागन' (1978), 'जानी दुश्मन' (1979), 'बिन फेरे हम तेरे' (1979), 'द बर्निंग ट्रेन' (1980), 'साजन की सहेली' (1981), 'बेमिसाल' (1982) या सिनेमांचा उल्लेख नेहमीच होतो.
9.. अभिनेता म्हणून क्रेझ कमी झाल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी ऋषी कपूर, श्रीदेवी आणि अनिल कपूर या आघाडीच्या कलाकारांना घेऊन 'गुरुदेव' या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होता. मात्र हा सिनेमा बनण्यास बरीच वर्षे लागली. हा सिनेमा अर्धवटच राहिला. कारण सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच विनोद मेहरा यांचे निधन झाले.
10.. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 30 ऑक्टोबर 1990 रोजी विनोद मेहरा यांची प्राणज्योत मालवली, वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विनोद मेहरी यांची न पाहिलेली छायाचित्रे...