आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावेतून शाही थाटात निघाली संजय हिंदुजांची वरात, 208 प्लेनने पोहोचले 800 VVIP

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- रणबीर सिंह, अर्जुन कपूर चाहत्यांसोबत. मध्यभागी- रवीना टंडन आणि उजवीकडे मलायका अरोरा खान.)
उदयपूरः हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष संजय हिंदुजा आणि डिझायनर अनु मीरचंदानी (मेहतानी) गुरुवारी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. लेकसिटीत झालेल्या या शाही लग्नात 208 चार्टर प्लेनने जवळजवळ 800 व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी झाले होते. लग्नाच्या विधी जगमंदिरात पार पडल्या.
गुरुवारी संध्याकाळी चार वाजता विलास पॅलेसच्या पिछोला किना-याहून गणगौर नावेतून वर-वधू जग मंदिरात पोहोचले. आकर्षक सजावट करण्यात आलेल्या 14 नावेतून सर्व वराती लग्नस्थळी दाखल झाले. सर्व पाहुण्यांसाठी इंडियन ट्रेडिशनल ड्रेस ही वेडिंग थीम होती. पुरुषांनी ब्लॅक अँड व्हाइट कोट परिधान केले होते. तर सर्व महिला ट्रेडिशनल लूकमध्ये होत्या. उदयविलास पॅलेसहून जगमंदिरात पोहोचलेल्या वरातीचे वधू पक्षाने पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. फोक म्युझिक आणि शहनाईच्या सूरात वर-वधू मंडपात आले.
बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी
या हायप्रोफाईल लग्नात स्टील किंग लक्ष्मी मित्तल, अडानी ग्रुपचे गौतम अडाणी यांच्यासह अनेक बिझनेस टायकून, हॉलिवूड आणि बॉलिवूच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा संजय हिंदुजा-अनु मीरचंदानीच्या शाही लग्नाची ही खास छायाचित्रे...