आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता शिगेला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस - जागितिक चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा ८४वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज रात्री (२६ फेब्रुवारी) कोडॅक थिएटरमध्ये रंगणार आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री या विभागात मिळालेली नामांकने पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट-
ह्युगो
वॉर हॉर्स
मनीबॉल
द आर्टिस्ट
द ट्रीप ऑफ लाईफमिडनाईट इन पॅरीसद हेल्पएक्स्ट्रीमली लाऊड एन्ड इन्क्रेडिबली


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-
मेरील स्ट्रीप (द आयरन लेडी)
ग्लेन क्लोज, वॉयला डेनिस (द हेल्प)
रुनी मारा (द गर्ल विद द ड्रॅगन टॅटू)
मिशेल विलियम्स (माय विक विथ मर्लिन)
बेरेनीस बेजो (द आर्टीस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता -
जॉर्ज क्लूनी (द डिसेन्डेंट्स)
ज्यॉ दुझारदा (द आर्टीस्ट)
गैरी ओल्डमॅन (टिंकर टेलर सोल्जर स्पाई)
ब्रॅड पिट (मनीबॉल)
डेनियन बिचीर (अ बेटर लाईफ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -
मार्टिन स्कोरसेजी (ह्युगो)
वुडी ऐलन (मिडनाईट इन पॅरीस)
टेरेंस मैलिक (द ट्री ऑफ लाईफ)
अलेक्झेंडर पेन (डिसेन्डेंट्स)
मिशेल अजानेविसयुस (द आर्टीस्ट)

विशेष म्हणजे मार्टीन स्कोरसेजी दिग्दर्शित 'ह्युगो' या थ्रीडी सिनेमाला तब्बल अकरा तर 'द आर्टीस्ट' सिनेमाला दहा नामांकन मिळाली आहेत.
पॅरीसमधल्या एका अवाढव्य स्टेशनमध्ये लपून-छपून घड्याळांची निगा राखणा-या छोट्या ह्युगोची गोष्ट कमालीची आकर्षित करणारी आहे.
८४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन बिली क्रिस्टल करणार आहेत. ६३ वर्षांच्या बिली यांनी यापूर्वी ८ वेळा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन केले आहे.‘ब्लॅक’साठी अमिताभ बच्चनला ऑस्कर पुरस्कार हवा होता - दिलीपकुमार
ऑस्कर 2012 च्या नामांकनासाठी भारतीय चित्रपटाची निवड सप्टेंबरअखेरपर्यंत
'स्लमडॉग मिलेनिअर'ची गाणी ऑस्कर योग्य नव्हतीच : इस्माईल