आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Facts Why We Are Kicked About Salman Khan's Kick

Friday Release: 'किक'साठी 40व्या मजल्यावरुन सलमानने घेतली उडी, जाणून घ्या 9 Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पोलंडच्या 'कल्चर अँड सायन्स' या सर्वात उंच बिल्डिंगच्या 40व्या मजल्यावरुन उडी घेताना सलमान खान)
मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'किक' या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. आज सेव्हन्टी एमएमवर सलमानचा किक रिलीज झाला आहे. सलमान या सिनेमात 'मास्क मॅन'ची भूमिका साकारत आहे. पहिल्यांदाच सलमान अशाप्रकारच्या भूमिकेत झळकतोय. याच कारणामुळे या सिनेमाचा ट्रेलर यूट्युबवर धूम करतोय. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सलमानचे चाहते सिनेमाविषयी उत्सुक होते. या सिनेमात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पहिल्यांदाच प्रेक्षकांना सिल्व्हर स्क्रिनवर बघायला मिळणार आहेत.
सिनेमाशी निगडीत 9 फॅक्ट्स...
1.. स्टंट मॅन सलमान
सलमानला नेहमी त्याचे चाहते सिनेमात अॅक्शन आणि स्टंट करताना बघतात. सलमानचे स्टंट आणि स्टाईल प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करते. सुपरस्टार रजनीकांतप्रमाणेच चाहते सलमानला पसंत करतात. किक या सिनेमातसुद्धा सलमान काही हटके स्टंट्स करताना दिसणार आहे.
पोलंडमधील कल्चर अँड सायन्स या सर्वात उंच बिल्डिंगच्या 40व्या मजल्यावरुन सलमानने उडी घेतली आहे. सलमानने बॉडी डबलची मदत न घेता स्वतः हा स्टंट केला आहे. याशिवाय धावत्या ट्रेनसमोरुन तो चालत जाताना दिसतो. हे दोन्ही सीन्स सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पसंत पडले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी 8 फॅक्ट्स...