आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Times Bollywood Actor Aamir Khan's Movie 'PK' Reminds Of '3 Idiots'

'3 इडियट्स'शी मिळते-जुळते आहेत 'PK'चे सीन, पाहा कशा SAME आहेत आयडिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('3 इडियट्स'मध्ये आमिर खान आणि PKमधील दृश्य)
मुंबईः आमिर खानचा 'पीके'चा ट्रेलर लोकांच्या चेह-यावर हसू फुलवतोय. मात्र या सिनेमातील बरेच सीन्स आपल्याला 'थ्री इडियट्स'ची आठवण करुन देणारे आहेत. 'पीके'च्या ट्रेलरमध्ये दिसत असलेल्या अनेक दृश्यांनी यापूर्वीच 'थ्री इडियट्स'च्या माध्यमातून प्रेक्षकांना भरभरुन हसवले आहे.
'थ्री इडियट्स'मध्ये राजकुमार हिराणी यांनी इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था आणि साधारण मान्यतांवर व्यंग केले होते, तर 'पीके'मध्ये आमिरचे पात्र अशाच मान्यतांना बाद करताना दिसेल. ट्रेलरमध्ये अनुष्का शर्मा म्हणते, "प्रत्येक रस्त्यावर एटीएम आहे आणि प्रत्येक निर्जन ठिकाणी एक कपड्यांचे दुकान आहे." या दृश्यात आमिर पैसे आणि कपडे चोरताना दिसतो. तर 'थ्री इडियट्स'मध्ये आर. माधवन रँचोविषयी बोलताना सांगतो, की ''काबिल बनों कामयाबी झक मारकर पीछे दौड़ेगी''. दोन्ही संवाद आयुष्यात अडचणीत अडकलेल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करतात. याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या 'पीके'च्या ट्रेलरमध्ये दिसतात.
(1)
थ्री इडियट्समधील ''तोहफू कुबूल हो जहांपनाह'' हा संवाद नक्कीच तुमच्या लक्षात असेल. हा सीन 'थ्री इडियट्स'मध्ये बराच गाजला होता. याच्याशी साधर्म्य साधणारे दृश्य पीकेतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'थ्री इडियट्स' आणि 'पीके'तील साधर्म्य साधणारे दृश्य...