आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 95th Birth Anniversary Of Villain Of The Millennium Pran Krishna Sikand

पडद्यावरील 'खलनायक' ख-या आयुष्यात होता 'हिरो', पाहा प्राण यांचे Rare Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जंजीर' सिनेमामध्ये प्राण हे मस्तीभ-या अंदाजात 'यारी है ईमान मेरी, यार मेरी जिंदगी' हे गाणे गाताना दिसले होते. वास्तविक आयुष्यातदेखील ते असेच आनंदी आणि मनमोकळे आयुष्य जगत होते. बॉलिवूड जगात उत्कृष्ट खलनायक म्हणून ओळखले जाणारे प्राण अर्थातच कृष्णा सिकंद पडद्यामागील आयुष्यात मात्र एखाद्या हीरोपेक्षा कमी नव्हते. प्राण साहेबांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीत झाला होता. त्यांचे पूर्ण नाव प्राण क्रिशन सिकंद असे आहे. 'यारे के यार प्राण' मृत्यू 12 जुलै 2013च्या रात्री मृत्यू झाला.
प्राण यांना अभिनेता नव्हे फोटोग्राफर व्हायचे होते-
प्राण नशीबानेच चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी लाहोरमध्ये फोटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र 1940 नंतर त्यांचे नशीब पालटले. त्यांना 'यमला जट' या पंजाबी सिनेमात पहिल्यांदा अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
पानच्या दुकानवर मिळाला पहिली सिनेमा-
प्राण यांच्या एक किस्सा खूप प्रसिध्द आहे. एकदा प्राण पान सेंटरवर पान खात होते. तेव्हा तिथे लेखक मोहम्मद वली आले आणि ते प्राण यांना म्हणाले, 'तु सिनेमात अभिनेय करशील?', यावर प्राण म्हणाले, 'का खिल्ली उडवताय? मी पान खाण्यासाठी आलो आहे.' वली मोहम्मद हे प्राण यांना म्हणाले त्यांच्याकडे एक भूमिका आणि त्यांना प्राण यांना काम करावे. 'यमला जट' हा एक पंजाबी सिनेमा होता आणि तो दलसुख पंचोलीने बनवला होता. या सिनेमाती निर्मिती 1940मध्ये झाली होती आणि त्यावेळी प्राण लाहोरमध्ये राहत होते.
मुंबईमध्ये केला करिअरसाठी संघर्ष
लाहोरच्या फिल्म इंडस्ट्रीत प्राण यांनी बरेच नाव कमवले होते. परंतु 1947मध्ये देशाचे बिभाजन झाले आणि ते लाहोरहून मुंबईला स्थायिक झाले. लाहोरमध्ये त्यांनी बरेच नाव कमवले परंतु मुंबईमध्ये येताच असे वाटू लागले, की त्यांचा अभिनय कुठे तरी हरवला होता. परंतु प्राण यांनी प्रयत्न चालू ठेवले. बॉलिवूडमध्ये काम शोधत राहिले.
त्यादरम्यान त्यांचा भेट उर्दूचे प्रसिध्द अफगाना निगार शादत हसन यांच्याशी झाली आणि त्यांनी प्राण यांना मुंबई टॉकिजच्या 'जिद्दी' सिमनेमात काम मिळवून दिले. 'जिद्दी' सिनेमात प्राण यांच्यासोबत देवानंद आणि कामिनी कौशल होत्या आणि हा सिनेमा शाहिद लतीफ यांनी दिग्दर्शित केला होता.
अनेक पुरस्कारने गौरव झाला-
प्राण साहेबांनी 350 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. प्राण यांना उपकार (1968), आँसू बन गये फूल (1970) आणि बेईमान (1968) या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांच्या नावी आहेत. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल त्यांना 2001 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
93व्या वर्षी झाले निधन-
प्राण साहेब यांनी 1945मध्ये शुक्ला आलूवालियासोबत लग्न केले. त्यांना तीन मुले (दोन मुले एकम मुलगी) आहेत. वयाच्या 93व्या वर्षी 12 फेब्रुवारी 2013 रोजी त्यांना अखेरचा श्वास घेतला.
प्राण आज आपल्यामध्ये नाहीत, पंरतु त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी त्यांची छायाचित्रे आपल्याकडे आहेत. जे त्यांच्या शानदार व्यक्तीमत्वाची आठवण आपल्याला करून देतात. त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला प्राण यांच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्राण यांच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे जे तुम्ही बघितलेली नाहीत.