आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhaskar Bollywood Awards Nomination In The Fresh Face Of The Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोण ठरणार 'फ्रेश फेस ऑफ द इयर' ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील पहिला ट्रुली डेमोक्रेटिक अवॉर्ड्स असलेल्या भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्ससाठी वोटिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला मत देऊन त्याच्याबरोबर रेड कार्पेटवर चालण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते. प्रत्येक कॅटेगरीप्रमाणे 'फ्रेश फेस ऑफ द इयर' या कॅटेगरीतही जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे.
या कॅटेगरीत पहिले नॉमिनेशन मिळाले आहे 'रॉकस्टार' फेम नर्गिस फखरीला. मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या नर्गिसने आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मोठी फॅन फॉलोईंग तयार केली आहे. नर्गिसचा 'रॉकस्टार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला शिवाय नर्गिसच्या अभिनयालासुद्धा प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली.
या कॅटेगरीमध्ये दुसरे नॉमिनेशन मिळाले आहे यामी गौतमला. यामीने 'विकी डोनर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामीने यापूर्वी छोट्या पडद्यावरही काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर यामीने प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळवली आहे.
बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरने 'इश्कजादे' या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनीसुद्धा या नवोदित अभिनेत्याला पसंत केले आहे. या चित्रपटात अर्जुनबरोबर परिणिती चोप्रा झळकली होती. चित्रपटाने चांगला बिझनेस केला. या चित्रपटासाठी अर्जुनला चौथे नॉमिनेशन मिळाले.
एमटीव्हीचा अँकर आयुष्यमान खुरानाने 'विकी डोनर' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनी आपला फॅन बनवले. चित्रपटाच्या युनिक थीममुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. हा चित्रपट जॉन अब्राहमने प्रोड्युस केला होता. या चित्रपटासाठी आयुष्यमानला पाचवे नॉमिनेशन मिळाले आहे.
या कॅटेगरीत सहावे नॉमिनेशन मिळाले आहे अभिनेता अरुणोदय सिंगला. अरुणोदयने 'ये साली जिंदगी' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली.
भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स ज्युरी मेंबर्स नसलेला पहिला पुरस्कार आहे. प्रेक्षकांच्या मतावर विजेत्याची निवड केली जाते. आपल्या आवडत्या कलाकाराला मत देण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com. मत नोंदणीची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१२ आहे.
टफ कॉम्पिटीशन ! विद्या, करीना, प्रियांका, कोणाला मिळणार अवॉर्ड ?
टफ कॉम्पिटीशन ! शाहरुख, अजय की रणबीर, कोण मारणार बाजी ?
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार
'आप हैं तो स्टार हैं' : ब्रिटनची मुलगी करतेय भारतीयांच्या मनावर राज्य
'आप हैं तो स्टार हैं' : या घटनेमुळे मिळाली अक्षयच्या आयुष्याला कलाटणी