आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhaskar Bollywood Awards Salute Amitabh Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशाप्रकारे उदयाला आला बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अँग्री यंग मॅन' ते 'शहनशाह ऑफ बॉलिवूड'पर्यंतचा हा मोठा प्रवास अमिताभ बच्चन यांनी केला आहे. सहसा काळा बदलतो त्याप्रमाणे लोकांची प्रसिद्धी कमी होते, मात्र अमिताभ असे एक नाव आहे, ज्याची प्रसिद्धी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमिताभ यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी निर्माते आतुर असतात, तर स्क्रिप्ट रायटर्स त्यांच्या पर्सनॅलिटीला शोभेल अशी स्क्रिप्ट लिहिण्याचे स्वप्न बघतात. बिग बींच्या कडक पर्सनॅलिटीमागे एक संवेदनशील अभिनेत्याचे रुप दडले आहे. या कलाकारासाठी सेल्युलॉईड प्रसिद्धीपेक्षा आपल्या असित्त्वाचे एक माध्यम आहे.
अमिताभ यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव इन्कलाब ठेवले होते, हे कदाचितच कुणाला ठाऊक असेल. नैनीतालमधील शेरवुड स्कुलमध्ये असताना अमिताभ यांची रुची अभिनयात वाढू लागला. दिल्लीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कोलकताला गेले. मात्र येथे त्यांचे मन रमले नाही. एक दिवस आपले मन जे सांगेल तेच करायचे असा दृढ निश्चय त्यांनी केला. कोलकतामधील शिपिंग कंपनीची चांगली नोकरी सोडून त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले. सडपातळ आणि उंच कदकाठी असलेल्या तरुणाने स्वप्न नगरी मुंबईत पाऊल ठेवले खरे, मात्र या मुंबईत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे सोपे नव्हते. या मुंईने त्यांना सहजासहजी स्विकारले नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली. जिथे कुठे ते काम मागायला जायचे, तिथे कधी त्यांची हाईट तर कधी रंगरुप त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे ठरत होते. कोणताच निर्माता-दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक नव्हता. त्याकाळात ६ फुट ३ इंच उंची असलेल्या अभिनेत्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी कुणीच धजावत नव्हते. उंचीमुळे चित्रपट मिळत नाही, म्हणून अमिताभ यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर यश मिळवण्याचे ठरवले, मात्र येथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. आवाज चांगला नाही म्हणून ऑल इंडिया रेडिओने त्यांना नोकरी नाकारली. प्रत्येक ठिकाणी अपयशच मिळत असल्यामुळे एके दिवशी त्यांनी निराश होऊन परतायचे ठरवले. त्याचदरम्यान त्यांना 'सात हिंदुस्थानी' हा चित्रपट ऑफर झाला. चित्रपट फारसे यश कमावू शकला नाही. मात्र याच चित्रपटासाठी अमिताभ यांना बेस्ट न्यूकमरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण या पुरस्कारानेही त्यांचे नशीब चमकले नाही. सक्षम अभिनय असतानाही त्यांना मिळणारे यश हे नाहीच्या बरोबरीत होते. त्यांनी अनेक चित्रपटात छोटे-मोठे रोल केले. काही चित्रपटासांठी त्यांनी व्हाईस ओवरही केला. स्ट्रगलिंगच्या या दिवसात त्यांना 'आनंद' हा चित्रपट मिळाला. ऋषिकेश मुखर्जींच्या या चित्रपटात राजेश खन्ना नावाचा सुपरस्टार असतानाही अमिताभ यांनी या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली. या चित्रपटासाठी अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'आनंद' चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र हा तरुण ठिकठाक अभिनय करतो एवढीच स्वतःची ओळख अमिताभ त्या काळात निर्माण करु शकले होते. पण 'जंजीर' या चित्रपटाने अमिताभ यांची सगळी स्वप्ने पूर्ण केली. 'जंजीर' हा अमिताभ यांच्या करिअरमधील १३ वा चित्रपट आहे.
'जंजीर'मुळे झाली करिअरची सकाळ...
'जंजीर' चित्रपटाने अमिताभ यांचे आयुष्यच पालटून गेले. या चित्रपटाने यशाबरोबर त्यांना आयुष्याची जोडीदार मिळवून दिली. या चित्रपटादरम्यान जया भादुडीबरोबर अमिताभ यांची भेट झाली. याच चित्रपटाने अमिताभ यांना अँग्री यंग मॅनची इमेज मिळवून दिली. १९७०च्या सुरुवातीच्या काळात अमिताभ यशस्वी झाले होते, मात्र अजून स्टारडम मिळायला वेळ होता. याच दशकात अमिताभ यांचे 'दीवार' आणि 'शोले' हे दोन मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाले. 'शोले'मध्ये अमिताभ यांनी जयची व्यक्तीरेखा साकारली होती. चित्रपटात जयचा मृत्यू झाला, मात्र अमिताभ नावाचा झंझावात उदयाला आला. त्यानंतर 'दीवार'ला मिळालेल्या यशामुळे अमिताभ बॉलिवूडमध्ये 'वन मॅन इंडस्ट्री'च्या नावाने ओळखले जाऊ लागले. एकेकाळी साईड रोल करणारे अमिताभ सेल्युलॉईडची जणू आत्माच बनले. अमिताभ यांच्या प्रसिद्धीपुढे दुसरे अभिनेते टिकू शकले नाही. यानंतर अमिताभ यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'अमर अकबर एन्थोनी', 'डॉन', 'त्रिशुल', 'काला पत्थर', 'सिलसिला' यांसारखे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. 'कूली' चित्रपटादरम्यान अमिताभ यांना जीवघेणा अपघात झाला. सेटवर मारहाणीच्या दृश्यादरम्यान ते गंभीर जखमी झाले. बरे होण्यासाठी त्यांना मोठा काळ लागला. यावेळी अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावे, म्हणून देशभरात प्रार्थना होऊ लागल्या. चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज जिवंत असल्याचे अमिताभ प्रांजळपणे कबूल करतात.
'केबीसी'मुळे झाला नवा जन्म...
अमिताभ बच्चन यांनी 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने काही चित्रपटांची निर्मिती केली, मात्र सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यांनी अनेक ठिकाणांहून कर्ज घेतेल, मात्र अखेर कंपनी डुबली. त्याचदरम्यान त्यांचे चित्रपटही फ्लॉप ठरु लागले. तेव्हा २००० हे वर्ष अमिताभ यांच्यासाठी आशेचे किरण घेऊन उगवले. यावर्षी 'कौन बनेगा करोडपती' नावाचा गेम शो होस्ट करण्याची त्यांना संधी मिळाली. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी इतिहासात नवीन अध्याय रचला. या कार्यक्रमाला तुफान लोकप्रियता मिळाला आणि जणू अमिताभ यांचा नवा जन्मच झाला. अमिताभ यांनी आपल्यावरचे सगले कर्ज चुकते करुन पुन्हा नव्याने कंपनी स्थापन केली.
आजही आहे सुपरस्टार...
राजेश खन्ना यांच्या नंतर बॉलिवूडमध्ये सुपरस्टारची ही उपाधी जर कुणाला मिळाली असेल तर ती फक्त अमिताभ बच्चन यांना. अमिताभ यांची जागा आजवर कुणीही घेतली नाही. राजेश खन्ना यांच्यानंतर अमिताभच ख-या अर्थाने बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत.
तुम्हीच निवडा तुमचा सुपरस्टार...
अमिताभ आमच्यासाठी एक उत्कृष्ठ कलाकार आणि एन्टरटेनर आहे. अमिताभ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स अशा स्टार्सला सलाम करत आहे, ज्यांना प्रेक्षकांनी सुपरस्टार बनवले आहे. ट्रुली डेमोक्रेटिक असलेला हा पहिला असा अवॉर्ड आहे, ज्यात कुणीही ज्युरी नाही. प्रेक्षकच आपल्या सुपरस्टारची निवड करतात. म्हणूनच अमिताभ यांना भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सची 'आप हैं तो स्टार हैं' ही पंचलाईन अगदी फिट बसते. तर मग भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com
'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार
'आप हैं तो स्टार हैं' : ब्रिटनची मुलगी करतेय भारतीयांच्या मनावर राज्य
'आप हैं तो स्टार हैं' : या घटनेमुळे मिळाली अक्षयच्या आयुष्याला कलाटणी
'आप हैं तो स्टार हैं' : चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे शाहरुख झाला किंग ऑफ बॉलिवूड !
'आप हैं, तो स्टार हैं'... अशाप्रकारे अजयने गाठले यशोशिखर !