आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेस्ट, सेक्सिएस्ट आणि गॉर्जिअस हे शब्द बिपाशा बासूला अगदी फिट बसतात. मात्र बालपणी या हॉट बिपाशाला आलेले अनुभव काही वेगळेच आहेत. बालपणी केवळ रंगरुपावरुनच नाही तर कमी उंचीमुळे बिपाशाला चिडवणा-या लोकांची संख्या कमी नव्हती. लोकांच्या टीकेला सामोरे जाणा-या बिपाशाने आपल्या त्याच रंगरुपाच्या जोरावर एक यशस्वी मॉडेल म्हणून आपले करिअर उभे केले. आपल्या पर्फेक्ट कर्व्ससाठी ओळखली जाणारी बिपाशा लहानपणी अगदी मुलांसारखी राहत होती. लोक तिला 'टॉमबॉय' म्हणून हाक मारायचे. आपल्या करामतींमुळे बिपाशा शाळेत 'लेडी गुंड' म्हणूनही प्रसिद्ध होती. तेव्हा कमी उंचीची बिपाशा सगळ्यांना आपल्या धाकात ठेवायची.दिल्लीत जन्मलेली बिपाशा वयाच्या आठव्या वर्षी आपल्या कुटुंबियांबरोबर कोलकत्याला शिफ्ट झाली. मेहर जेसिया रामपालने एके दिवशी बिपाशाला हॉटेलमध्ये पाहिले आणि तिथे तिला मॉडेलिंग जॉईन करण्याचा सल्ला दिला. मॉडेलिंग जगतात पदार्पण करताच बिपाशाने वयाच्या केवळ १७ व्या वर्षीच 'सुपरमॉडेल ऑफ द वर्ल्ड' हा किताब आपल्या नावी करुन सगळ्यांना आश्चर्यचा धक्का दिला. त्याचवर्षी बिपाशाने 'गोदरेज सिन्थॉल सुपरमॉडेल' या कॉन्टेस्टमध्येही बाजी मारली. फोर्ट कंपनीने बिपाशाला न्यूयॉर्कमध्ये जाण्याची संधी दिली. अशाप्रकारे बिप्स टीनएज सेन्सेशन ठरली आणि पाहता पाहता तब्बल ४० मॅग्झिनची कव्हर गर्ल बनली.
बी टाऊनमध्ये एन्ट्री...
अभिनेता विनोद खन्ना यांची बिपाशाला आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटात अक्षय खन्नाच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा होती. गोदरेज सिन्थॉल सुपरमॉडेल कॉन्टेस्टमध्ये विनोद खन्ना परिक्षक म्हणून सहभागी झाले होते. या स्पर्धेची बिपाशा विजेती ठरली होती. विनोद खन्ना यांनी हा चित्रपट बिपाशाला ऑफर केला, मात्र तिने ही ऑफर स्विकारली नाही. त्यावेळी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे योग्य वय नसल्याचे कारण बिपाशाने विनोद खन्नांना दिले होते. त्यानंतर बिपाशा जेव्हा भारतात परतली, तेव्हा जया बच्चनने बिपाशाला अभिषेक बच्चनबरोबर जे.पी. दत्ताच्या 'आखिरी मुगल' नावाच्या चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट सुरुच होऊ शकला नाही. त्यानंतर जे. पी. दत्ता यांनी 'रेफ्युजी'मध्ये बिपाशाला कास्ट करण्याची इच्छा तिच्याकडे व्यक्त केली, मात्र बिपाशाने ही ऑफर सुद्धा नाकारली.
अखेर २०११मध्ये रिलीज झालेल्या अब्बास मस्तानच्या 'अजनबी' या चित्रपटाद्वारे बिपाशाने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. आपल्या या पहिल्याच चित्रपटात बिपाशाने निगेटिव्ह भूमिका साकारली. या चित्रपटासाठी बिपाशाला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला.
२००३ साली बिपाशा पूजा भट्टच्या 'जिस्म' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाने बिपाशाला एक वेगळी ओळख दिली. 'जिस्म' या सेक्सुअल थ्रिलर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळाले, शिवाय समीक्षकांनीही बिपाशाच्या अभिनयाचे कौतूक केले. बिपाशाचे कौतूक करताना प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श म्हणतात की, बिपाशाचा अंदाज अगदी झीनत अमान आणि परवीन बाबीसारखा कातिलाना आहे. 'जिस्म'चे सगळे क्रेडिट बिपाशालाच मिळाले.
चित्रपटांव्यतिरिक्त बिपाशा सोनू निगमच्या 'किस्मत' अल्बममधील 'तू कब ये जानेगी' या गाण्यात झळकली आहे. बिपाशा अलीकडेच परदेशी गायक जे शांच्या म्युझिक व्हिडिओ 'स्टोलेनश'मध्येही झळकली आहे.
स्वतःवर प्रेम कराल तर जगही तुमच्यावर प्रेम करेल
बिपाशा आपल्या फिटनेसविषयी नेहमीच जागरुक असते. बिप्सने नुकतीच 'लव्ह युअर सेल्फ' नावाची डीव्हीडी लॉन्च केली आहे. या डीव्हीडीमध्ये बिपाशा फिटनेसचे धडे देताना दिसत आहे. बिपाशा म्हणते, 'लव्ह युअर सेल्फ' या संकल्पनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. हाच विचार मला अडचणीतही टेंशन फ्री ठेवतो. 'रेस' आणि 'बचना ए हसीनो' यांसारखे कमर्शिअल हिट्स देणा-या बिपाशाच्या मते, सेक्सी दिसण्यासाठी कॉन्फिडन्सबरोबरच हजरजबाबीपणाही महत्त्वाचा आहे. फक्त सुंदर बॉडी तुम्हाला सेक्सी बनवत नाही.
बिपाशाला काही वर्षांपूर्वी आशिया खंडातील सेक्सिएस्ट वुमन या किताबानेही सन्मानित करण्यात आले आहे. बिपाशाला याचा गर्व आहे. ती म्हणते, ही कॉम्प्लिमेंट मिळवणारा कुणीही आनंदी होणारच.
रुसच्या सैनिकांनाही केले घायाळ
बिपाशा जेव्हा 'प्लेअर्स'च्या शुटिंगच्या निमित्ताने रुसला गेली होती, तेव्हा तेथील सैनिकांना बिपाशाला भेटायची इच्छा होती. ही गोष्ट जेव्हा बिपाशाला कळली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. विशेष म्हणजे या सैनिकांनी बिपाशाची सगळी गाणी पाहिली होती आणि तिचे 'बिल्लो राणी 'आणि 'बिडी जलाईले' ही गाणी त्यांची आवडती गाणी होती. बिपाशा त्यांना भेटली आणि भारताबाहेरही तिचे एवढे चाहते आहे, हे पाहून खूपच खुश झाली.
तुम्हीच निवडा तुमचा सुपरस्टार
बिपाशा आमच्यासाठी एक उत्कृष्ठ कलाकार आणि एन्टरटेनर आहे. बिपाशाने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स अशा स्टार्सला सलाम करत आहे, ज्यांना प्रेक्षकांनी सुपरस्टार बनवले आहे. ट्रुली डेमोक्रेटिक असलेला हा पहिला असा अवॉर्ड आहे, ज्यात कुणीही ज्युरी नाहीत. प्रेक्षकच आपल्या सुपरस्टारची निवड करतात. म्हणूनच बिपाशाला भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सची 'आप हैं तो स्टार हैं' ही पंचलाईन अगदी फिट बसते. तर मग भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com
ब्रिटनची मुलगी करतेय भारतीयांच्या मनावर राज्य
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार
'आप हैं, तो स्टार हैं'... अशाप्रकारे अजयने गाठले यशोशिखर !या घटनेमुळे मिळाली अक्षयच्या आयुष्याला कलाटणी
चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे शाहरुख झाला किंग ऑफ बॉलिवूड !