आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आप हैं तो स्टार हैं' : माधुरीवर सारेच फिदा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

८० च्या दशकात बॉलिवुडला माधुरी दिक्षित नावाचं सुंदर स्वप्न पडलं. तिचं दिसणं, तिचं हसणं प्रेक्षकांवर गारुड करत होतं. एकीकडे तिची तुलना मधुबालाशी करताना मर्लिन मन्रो ऑफ ईस्ट असं बिरुद तिला चिटकवण्यात आलं. दीड दशकांहून अधिक काळ माधुरीने बॉलिवूडवर राज्य केले. तसे पाहता एखाद्या अभिनेत्रीचे करिअर बॉलिवूडमध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राहात नाही. केवळ अभिनेतेच बॉलिवूडमध्ये दिर्घ काळ आपले करिअर करु शकतात असेही समजले जाते. मात्र माधुरीने या सगळ्या गोष्टी फोल ठरवल्या. माधुरी आजही छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्टिव आहे. माधुरी शंकर दीक्षितने मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण घेताना भविष्यात अभिनयाच्या क्षेत्रात कधी यशोशिखरावर पोहोचेल याचा विचारही केला नव्हता. मात्र ही कथ्थक नृत्यांगणा सिल्व्हर स्क्रिनपासून स्वतःला जास्त दिवस दुर ठेऊ शकली नाही.
चित्रपटांना सुरुवात...
माधुरीचा पहिला चित्रपट 'अबोध' जास्त कमाल करु शकला नाही. या चित्रपटात माधुरीचे कामाला कुणीच नोटिस केले नाही. त्यानंतर माधुरीने 'आवारा बाप' आणि 'स्वाती' यांसारख्या फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. अखेर एक दिवस सुभाष घई यांची नजर माधुरीवर पडली. त्यांनी आपल्या 'कर्मा' या चित्रपटातील एका डान्स सीक्वेन्ससाठी माधुरीची निवड केली. मात्र हा सीन चित्रपटातून वगळण्यात आला. पण घई यांनी माधुरीला त्यांच्या दुस-या चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचे कबूल केले आणि एक अटसुद्धा ठेवली.
माधुरीने चित्रपटांमध्ये छोटे-मोठे रोल करणारी अभिनेत्री म्हणून स्वतःची इमेज तयार कुरु नये, असे सुभाष घई यांना वाटत होते. माधुरीने त्यांचे म्हणणे ऐकले आणि सुभाष घई यांनी माधुरीला 'उत्तर दक्षिण' या चित्रपटात कास्ट केले. या चित्रपटामुळेसुद्धा माधुरीला यशाची चव चाखता आली नाही. तोपर्यंत सुभाष घई यांनी माधुरीच्या पोटॅन्शिअलला ओळखले होते. त्यांनी माधुरीला 'राम लखन' या सुपरहिट चित्रपटाद्वारे रिलॉन्च केले. मात्र याआधी माधुरीचा 'तेजाब' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील माधुरीचे 'एक दो तीन...' हे गाणे तुफान गाजले आणि याप्रकारे माधुरी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या पंगतीत आली. 'तेजाब'ने गोल्डन ज्युबली साजरी केली आणि हा चित्रपट १९८८ सालचा सुपरडुपर हिट चित्रपट ठरला.
तेजाबच्या यशानंतर माधुरीने मागे वळून पाहिले नाही. १९९०मध्ये आलेल्या 'दिल' या चित्रपटात माधुरीने आमिर खानबरोबर स्क्रिन शेअर केली. या चित्रपटासाठी माधुरीला तिच्या करिअरमधला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. सोबत दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्याबरोबर माधुरीचे चांगले प्रोफेशनल रिलेशन तयार झाले. इंद्र कुमार यांच्या 'बेटा' आणि 'राजा' या दोन चित्रपटांमध्ये माधुरी झळकली. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला. ९०च्या दशकात प्रत्येक वर्षी माधुरीने हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. यामध्ये साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, राजा हे चित्रपट उल्लेखनीय आहे.
१९९६ मध्ये रिलीज झालेला 'प्रेम ग्रंथ' हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र समीक्षकांनी या चित्रपटातील माधुरीच्या अभिनयाचे कौतूक केले. त्यानंतर माधुरीचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटू लागला. त्याचदरम्यान शाहरुख खानसोबत माधुरी 'दिल तो पागल है' या चित्रपटात झळकली आणि पुन्हा आपली जादू दाखवली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटासाठी माधुरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याचवर्षी माधुरी प्रकाश झांच्या 'मृत्युदंड'मध्येही झळकली. या चित्रपटात माधुरीने गंभीर स्वरुपाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीने स्टार स्क्रिन आणि सॅन्सुई अवॉर्ड आपल्या नावी केले.
२०००साली माधुरीचा 'पुकार' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटासाठीही तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा सन्मान माधुरीला इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅकॅडमी (आयफा)ने दिला.
माधुरीवर सगळेच फिदा...
माधुरीची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. तरुणांमध्ये माधुरी पॉप्युलर आहे. शिवाय दिवंगत प्रसिद्ध पेंटर एमएफ हुसैनही माधुरी मोठे फॅन होते. माधुरीचा मी फक्त दिवानाच नाही, तर तिच्या प्रेमात आकंट बुडालो आहे, अशी कबुली हुसैन यांनी दिली होती. त्यांनी सांगितले होते की, सुरुवातीला ते केवळ तिची पेंटिंग करुन आनंदी व्हायचे. कारण तिला भेटल्यावर आनंदाने पागल होण्याची भीती त्यांना वाटत होती. मात्र माधुरीच्या सौंदर्याने त्यांना तिला भेटायला भाग पाडले.
हुसैन यांनी माधुरीला घेऊन 'गजगामिनी' हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट कमर्शिअली यशस्वी झाला नसला तरीसुद्धा समीक्षकांनी त्याला पसंतीची पावती दिली.
माधुरी त्यानंतर संजय लीला भन्साळींच्या 'देवदास' या चित्रपटात झळकली. हा चित्रपट 'कान फिल्म फेस्टिवल'मध्येही दाखवण्यात आला. या चित्रपटासाठी माधुरीला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला. २००८मध्ये 'आजा नच ले' या चित्रपटाद्वारे माधुरीने कमबॅक केले.
तुम्हीच निवडा तुमचा सुपरस्टार
माधुरी आमच्यासाठी एक उत्कृष्ठ कलाकार आणि एन्टरटेनर आहे. माधुरीने मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स अशा स्टार्सला सलाम करत आहे, ज्यांना प्रेक्षकांनी सुपरस्टार बनवले आहे. ट्रुली डेमोक्रेटिक असलेला हा पहिला असा अवॉर्ड आहे, ज्यात कुणीही ज्युरी नाहीत. प्रेक्षकच आपल्या सुपरस्टारची निवड करतात. म्हणूनच माधुरीला भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सची 'आप हैं तो स्टार हैं' ही पंचलाईन अगदी फिट बसते. तर मग भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com
'आप हैं तो स्टार हैं' : अशाप्रकारे उदय झाला बॉलिवूडच्या 'अँग्री यंग मॅन'चा...
'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार
'आप हैं तो स्टार हैं' : ब्रिटनची मुलगी करतेय भारतीयांच्या मनावर राज्य
'आप हैं तो स्टार हैं' : या घटनेमुळे मिळाली अक्षयच्या आयुष्याला कलाटणी