आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टफ कॉम्पिटीशन ! विद्या, करीना, प्रियांका, कोणाला मिळणार अवॉर्ड ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनचा पहिला ट्रुली डेमोक्रेटीक असेलेल्या भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्ससाठी वोटिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. आपल्या फेवरेट स्टारला मत देऊन त्याच्याबरोबर रेड कार्पेटवर चालण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या कॅटेगरीतही टफ कॉम्पिटीशन पाहायला मिळत आहे.
या कॅटेगरीत पहिले नॉमिनेशन अभिनेत्री विद्या बालनला तब्बल दोन चित्रपटांसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. विद्याचे हे दोन चित्रपट म्हणजे 'कहानी ' आणि 'डर्टी पिक्चर'. 'कहानी' थ्रिलर चित्रपट असून त्याला सुजॉय घोषने दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटाचे बजेट आठ कोटी इतके होते, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल शंभर कोटींचा बिझनेस केला. चित्रपटाची पटकथा दमदार तर होतीच, सोबत विद्याचा अभिनयही जबरदस्त होता. या चित्रपटाला समीक्षकांनीही दाद दिली. शिवाय डर्टी पिक्चरसाठी विद्याने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या कॅटेगरीत दुसरे नामांकन मिळाले आहे अभिनेत्री सोहा अली खानला. 'साऊंडट्रॅक' या चित्रपटासाठी सोहाला हे नामांकन मिळाले आहे. 'इट्स ऑल गॉन पेटे टॉन्ग' या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक होता. सोहाच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटासाठी कतरिना कैफला या कॅटेगरीत तिसरे नॉमिनेशन मिळाले आहे. या चित्रपटात कतरिनाबरोबर ऋतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल हे कलाकाराही झळकले होते. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट १८०० स्क्रिनवर प्रदर्शित झाला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला होता.
चौथे नॉमिनेशन मिळाले आहे अभिनेत्री प्रियांका चोप्राला. 'डॉन २' या चित्रपटासाठी प्रियांकाला हे नॉमिनेशन मिळाले आहे. प्रियांकाच्या या चित्रपटाने भारताबरोबरच ओवरसीजमध्ये २०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
'एक मैं और एक तू' या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री करीना कपूरलाही हे नॉमिशन मिळाले आहे. करीना या नॉमिनेशन यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात करीना अभिनेता इम्रान खानबरोबर झळकली होती.
पाकिस्तानी दिग्दर्शक शोएब मंसूर दिग्दर्शत 'बोल' या चित्रपटाला भारतात चांगला रिस्पॉन्स मिळाला. या चित्रपटातील अभिनेत्री हुमैमा मलिकच्या अभिनयाचेही खूप कौतूक झाले. या चित्रपटासाठी हुमैमाला भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले आहे. या यादीत हुमैमा सातव्या क्रमांकावर आहे.
भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स भारतातील पहिला असा पुरस्कार आहे, ज्यात कुणीही ज्युरी मेंबर नाही. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर सुपरस्टारची निवड केली जाते. तर मग आपल्या आवडत्या सुपरस्टारची निवड करण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com. मत देण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०१२ आहे.
टफ कॉम्पिटीशन ! शाहरुख, अजय की रणबीर, कोण मारणार बाजी ?
'आप हैं तो स्टार हैं' : प्रेक्षकांना पडलेले माधुरी दीक्षित नावाचे सुंदर स्वप्न !
'आप हैं तो स्टार हैं' : अशाप्रकारे उदय झाला बॉलिवूडच्या 'अँग्री यंग मॅन'चा...
'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार