आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It Took Me 40 Screen Tests To Become 'parineeta'

17 मेकअप शूट्स आणि 40 स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर विद्या झाली 'परिणीता'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''माझे दोन मल्याळी चित्रपट तयार होऊ शकले नाही. तामिळमध्ये तयार होणारा तिसरा सिनेमा मी सोडून दिला. अभिनय करणे जमत नाही असे सांगून एका तामिळ चित्रपटातून मला काढून टाकण्यात आले. त्यामुळे माझ्यात हीन भावना एवढी वाढली की आरशात स्वतःला बघायचीसुद्धा मला भीती वाटू लागली.जे घडले ते चांगल्यासाठीच असे समजून मी देवाचे आभार मानते. देवाच्या कृपेने सगळेकाही सुरळीत सुरु आहे.''
अभिनेत्री विद्या बालनने आपल्या छोट्याशा करिअरमध्ये अनेक फिल्मफेअर आणि स्क्रिन अवॉर्ड्सवरबरोबरच राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली आणि टीकाकारांचे तोंड बंद केले. केरळच्या पलघटमध्ये जन्मलेली विद्या मुंबईत लहानाची मोठी झाली. बालपणी विद्या खूपच आळशी होती. घरातील वातावरणानुसार विद्याने कर्नाटकी डान्स क्लासेस जॉईन केले. मात्र सकाळी उठायचा कंटाळा येत असल्यामुळे विद्याने लवकरत डान्स क्लासेसला जाणे बंद केले. शालेय जीवनात विद्या इतर मुलींच्या तुलनेत खूपच लठ्ठ होती.
टॉमबॉय म्हणून ओळखली जाणारी विद्या शाहरुख खानची मोठी चाहती आहे. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवल्यानंतर विद्याने आपले वजन कमी केले. तामिळ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने विद्याला रिजेक्ट केले होते. मात्र तिने हार मानली नाही. अखेर विद्याला सुपरस्टार मोहनलालच्या अपोझिट 'चक्रम' या तामिळ चित्रपटात भूमिका मिळाली. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट तयार होऊ शकला नाही.
१९९८ साली विद्याला सर्फ एक्सेलची जाहिरात मिळाली. त्यानंतर विद्याने मागे वळून पाहिले नाही. विद्याने प्रदीप सरकारबरोबर ९० हून अधिक कमर्शिअल्समध्ये एकत्र काम केले. पंकज उधास, युफोरिया आणि शुभा मुद्रल यांच्या म्युझिक अल्बममध्येही विद्या झळकली. शिवाय स्मॉल स्क्रिनवरील एकता कपूरच्या 'हम पांच' आणि अशोक पंडित यांच्या 'हसते खेलते' या मालिकांमध्येही विद्या दिसली.
२००३ साली 'भालो ठेको' या बंगाली चित्रपटात जॉय मुखर्जीबरोबर विद्याला कास्ट करण्यात आले. २००६मध्ये रिलीज झालेला हा हिट सिनेमा ठरला. याचदरम्यान विधु विनोद चोप्राने विद्याला 'परिणीता'साठी अप्रोच केले. १७ मेकअप शुट्स आणि ४० स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर विद्या परिणीतामध्ये लीड रोलमध्ये झळकली. विद्याला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला.
'परिणीता' हिट ठरल्यानंतर एकेकाळी विद्याला रिजेक्ट करणा-या दिग्दर्शकाने तिला दशावतारम या चित्रपटात घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र विद्याने या दिग्दर्शकाला नकार दिला. अखेर 'दशावतारम'मध्ये असीन झळकली.
अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही विद्या अग्रेसर आहे. देशातील मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणा-या सामाजिक संस्थांबरोबर विद्या जुळलेली आहे. सोबतच अमेरिकेतील अमेरिकन्स फॉर एड्स रिसर्च या संस्थेबरोबरही विद्या काम करते. ही संस्था एड्स रुग्ण आणि ड्रग एडिक्ट मुलांसाठी काम करते. वादांपासून स्वतःला नेहमीच दूर ठेवणारी विद्या इंडस्ट्रीमधील चांगली फ्रेंड समजली जाते. साई बाबांची भक्त असलेली विद्या प्रत्येक गुरुवारी मंदिरात जायला विसरत नाही. विद्याच्या यशात तिच्या चाहत्यांचा मोलाचा वाटा आहे. फिल्मी बॅकग्राऊंड नसताना आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत विद्याच्या नावाचा समावेश आहे.
चाहत्यांच्या प्रेमामुळे विद्याला यशोशिखर गाठता आहे. म्हणूनच विद्याला भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सची 'आप हैं तो स्टार हैं' ही पंचलाईन अगदी फिट बसते. जनतेचा सुपरस्टार असेलेल्या कलाकाराला भास्कर बॉलिवूड अवॉर्ड सलाम करतो. आपल्या आवडत्या सुपरस्टारची निवड करण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com
'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज
'आप हैं तो स्टार हैं':टॉयलेटमध्ये चिप्स खाणारी तरुणी झाली सुपरस्टार
'आप हैं तो स्टार हैं' : ब्रिटनची मुलगी करतेय भारतीयांच्या मनावर राज्य