आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'यशस्वी होण्यासाठी मनाच्या कोप-यात दुःख असायला हवे'- ए.आर.रहमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्ट १९९१ सालची आहे, जेव्हा दिग्दर्शक मणी रत्नम आपल्या नव्या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शकाच्या शोधात होते. मणींच्या दहा चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करणा-या इलइयाराजाबरोबर त्यांच्या संबंधात वितुष्ट निर्माण झाले होते. एक दिवस एका अवॉर्ड सोहळ्यादरम्यान मणी रत्नम यांची नजर एका तरुणावर पडली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये या तरुणाला 'लियो कॉफी'च्या जाहिरातीसाठी बेस्ट अ‍ॅड जिंगलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मणी यांची चुलत बहिणी शारदा त्रिलोक यांनी त्यांची ओळख या तरुणाशी करुन दिली. शारदा यांनी या तरुणाची इतकी प्रशंसा केली की, मणी त्याचे संगीत ऐकायला खूपच आतुर झाले. या तरुण कंपोजरने आनंदात काही चाली तयार केल्या. मात्र मणी तब्बल सहा महिन्यांनी या तरुणाच्या स्टुडिओमध्ये संगीत ऐकायला आहे. दक्षिण भारतातील कावेरी नदीच्या विवादावर या तरुणाने जे संगीत तयार केले होते, तेच संगीत त्याने मणींना ऐकवले.
मणी रत्नम या तरुणाच्या संगीताने एवढे प्रभावित झाले की, कोणताही विचार न करता त्यांनी त्याला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. दुर्दैवाने चित्रपट तयार होऊ शकला नाही. मात्र या तरुणाबरोबर एकदा तरी काम करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांनी तामिळ दिग्दर्शक बालाचंदर यांच्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी या युवकावर सोपवली. हा चित्रपट होता 'रोजा'. पाहता पाहता या चित्रपटातील गाणी खूपच लोकप्रिय झाली. या चित्रपटाच्या रुपाने हिंदी सिनेमाला नवीन लीजेंड मिळाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या २५ वर्षीय तरुणाचे नाव होते ए. आर. रहमान. या चित्रपटानंतर जे काही घडले ते सर्व काही ए.आर. रहमानच्या यशाची कहाणी सांगणारे आहे.
गीतकार गुलजार यांनी रहमानबरोबर अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. गुलजार म्हणतात, ''रहमान हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड आहे. या एकट्या व्यक्तीने संगीताचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. रहमानने मुखडा-अंतरा-मुखडाचा ट्रेंड तोडला. रहमान दोन वेगवेगळ्या गाण्यांच्या चालीवरुन नवीन चाल कंपोज करुन गाणे तयार करु शकतो. रहमानची ही चाल ऐकणा-यांना ती अगदी नवीन वाटेल याची शाश्वती आहे. रहमानच्या गाण्याचा विशिष्ट साचा असणे गरजेचे नाही. त्याचे प्रत्येक गाणे प्रभावशाली आहे.''
रहमानविषयीची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ते नेहमी नवीन आवाजांना संधी देतात. रहमानच्या मते, जर गाण्यात कोणती गडबडी झालीच तर त्याला ह्युमन टच येतो. रहमानचे जवळचे मित्र रंजीत बैरट यांनी सांगितल्याप्रमाणे, ''कुमार सानू किंवा उदित नारायण यांच्यासारखे दिग्गज गायक वेळेत स्टुडिओत पोहोचले नाही तर रेकॉर्डिंग रद्द करावी लागेल अशी भीती म्युझिक इंडस्ट्रीतील कंपोजर्स वाटू लागते. मात्र अशा परिस्थिती रहमान घाबरत नाही. ते स्टुडिओत आजुबाजुला बघतात आणि एका अनट्रेंड आवाजाबरोबर एक्सपिरिमेंट करतात. रहमान उठता, बसता, झोपता फक्त संगीतातच रमताना दिसतात. रहमान संगीताचा किमयागार आहे.''
रहमानचे आवडते दिग्दर्शक राम गोपाल वर्मा म्हणतात, ''रहमानच्या संगीतानुसार एखादे गाणे चित्रित करणे खूपच अवघड काम आहे.''
रहमाननचे प्रतिस्पर्धी असलेले संगीतकार नदीम-श्रवण या दोडीच्या मते, ''रहमानवर दाक्षिणात्य संगीताचा प्रभाव असताना ते नॅशनल साऊंड तयार करतात. रहमानचे प्रत्येक गाणे श्रोत्यांच्या पसंतीला पडतेच.''
आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त असेलेले तबलावादक उस्ताद जाकिर हुसैन यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ''रहमानने 'कलर्स' अल्बमसाठी व्हायलनिस्ट वैद्यनाथ आणि ड्रमर शिवमणी यांच्याबरोबर कीबोर्ड प्ले केला होता. त्यावेळी रहमान फक्त १९ वर्षांचे होते. त्यांनी एवढ्या कमी वयात क्लासिकलपासून जॅज, रॉक आणि कर्नाटकी संगीतापर्यंत सगळ्यात मास्टरी मिळवली होती.''
लता मंगेशकर रहमानबरोबर काम करतानाचा अनुभव सांगताना म्हणतात की, ''रहमानला रात्रीच्या वेळेत म्युझिक रेकॉर्ड करण्याची सवय आहे. मात्र रहमान माझ्याबरोबर नेहमी सकाळच्या वेळेत जेव्हा माझा आवाज फ्रेश असतो तेव्हा काम करतो. मला रात्री गाणे रेकॉर्ड करायला आवडत नाही. जेव्हा एखादा कलाकार दुस-या कलाकारासाठी असे काही करतो, तेव्हा खरच खूप आनंद होतो. शिवाय कामही चांगले होते. रहमानला एखादे गाणे रेकॉर्ड करायला फारसा वेळ लागत नाही. 'जिया जले' हे गाणे आम्ही केवळ ४० मिनिटांमध्ये रेकॉर्ड केले होते.''
कंपोजर विशाल ददलानी सांगतात की, ''रहमान म्युझिक प्रॉडक्शनचे एन्साइक्लोपीडिया आहेत.'' तर कोरिओग्राफर च्चिनी प्रकाश म्हणतात, ''रहमानच्या गाण्यांवर कोरिओग्राफी करणे फारच अवघड काम आहे. रहमान 4-8-12-16 बीट्स के रिद्मला फॉलो करत नाहीत. ते अनप्रेडिक्टेबल आहेत. कधी कधी 2 नंतर 4 बीट न देता ते 3/4चा बीट देतात. अशात गाणे कोरिग्राफ करणे आमच्यासाठी खूपच अवघड होऊन बसते.''
अ‍ॅकॅडमी अवॉर्डवर आपले नाव कोरुन रचला इतिहास
२००९ साली 'स्लमडॉग मिलिनेयर' या चित्रपटातील संगीतासाठी रहमानला 'बेस्ट ओरिजिनल स्कोर' आणि 'बेस्ट ओरिजिनल साँग'च्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऑस्कर पुरस्कार पटकावणारे रहमान पहिले भारतीय संगीतकार आहेत. संपूर्ण जगात आपल्या कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले रहमान म्हणतात, ''फुल-फ्लेजेड म्युझिक आर्टिस्ट बनायची इच्छा असलेल्या व्यक्तीजवळ फक्त राग आणि तांत्रिकी गोष्टींची माहिती असून चालत नाही. त्या व्यक्तीजवळ हुशारीबरोबरच लाईफ आणि फिलॉसॉफीमध्येही रुची असायला हवी. त्याच्या मनाच्या एका कोप-यात लपलेले दुःखही असायला हवे.''
रहमानने फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रहमानला त्याच्या चाहत्यांनीही मोलाची साथ दिली आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळे रहमानने यशोशिखर गाठले आहे. म्हणूनच रहमानला भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सची 'आप हैं तो स्टार हैं' ही पंचलाईन अगदी फिट बसते.
भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स जनतेच्या सुपरस्टारला सलाम करत आहे. ट्रुली डेमोक्रेटिक असलेला हा पुरस्कार आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com'आप हैं तो स्टार हैं' : प्रेक्षकांना पडलेले माधुरी दीक्षित नावाचे सुंदर स्वप्न !
'आप हैं तो स्टार हैं' : अशाप्रकारे उदय झाला बॉलिवूडच्या 'अँग्री यंग मॅन'चा...
'आप हैं तो स्टार हैं' : वयाच्या १७व्या वर्षीच बिपाशाने जिंकले होते जग !
'आप हैं तो स्टार हैं' : धर्मेंद्र लुक्स आणि अ‍ॅक्टिंगचे अनोखे पॅकेज