आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणता सिनेमा ठरणार 'फिल्म ऑफ द इयर' ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचा पहिला ट्रुली डेमोक्रेटिक असलेल्या भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्सच्या 'फिल्म ऑफ द इयर' या कॅटेगरीतील नॉमिनेशन यादीवर एक नजर टाकुया.
या कॅटेगरीत 'विकी डोनर' या चित्रपटाला पहिले नॉमिनेशन मिळाले आहे. शुजीत सरकारने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. स्पर्म डोनेशनसारख्या हटके विषयावर हा चित्रपट आधारित होता.
'पान सिंग तोमर' या चित्रपटाला दुसरे नॉमिनेशन मिळाले आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात इमरान खान झळकला होता. तिग्मांशू धुलियाने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
फिल्म ऑफ द इयर या विभागात तिसरे नॉमिनेशन मिळाले आहे 'आय एम कलाम' या चित्रपटाला. एका गरीब मुलाला शिक्षणाची आवड असते. मात्र गरीबीमुळे त्याला एका ढाब्यावर काम करावे लागते. एक दिवस त्याची मैत्री राजघराण्यातील मुलाशी होते. त्याच्याकडून त्याला एपीजे अब्दुल कमाल आझाद यांच्याविषयी कळते. त्यांच्याबद्दल ऐकून तो एवढा प्रभावित होतो की स्वतःचे नावच कलाम ठेवतो. अब्दुल कलाम यांना भेटण्याची त्याची इच्छा असते. हा चित्रपट माधब पांडा यांनी दिग्दर्शित केला होता.
नितेश तलवार आणि विशाल बहल यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चिल्लर पार्टी' या चित्रपटाला चौथे नामांकन मिळाले आहे. सलमान खान आणि रॉनी स्क्रुवाला यांनी हा सिनेमा प्रोड्युस केला होता. लहान मुलांची धमाल असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
सोहा अली खान आणि राजीव खंडेलवाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'साऊंडट्रॅक' या चित्रपटाला पाचवे नॉमिनेशन मिळाले आहे. नीरव घोषने हा सिनेमा डिरेक्ट केला होता.
सहावे नॉमिनेशन मिळाले आहे ते 'शैतान' या चित्रपटाला. अनुराग कश्यपचा हा सिनेमा बिजॉय नाम्बियारने दिग्दर्शित केला होता. रजत कपूर, कल्कि कोएचलिन आणि पवन मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या.
या कॅटेगरीत आठवे नॉमिनेशन मिळवले आहे ते 'बोल' या चित्रपटाने. बोल हा पाकिस्तानी चित्रपट आहे. शोएब मंसूर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
लास्ट बट नॉट द लिस्ट नववे नॉमिनेशन मिळाले आहे ते 'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटाला. दोन भागात हा सिनेमा रिलीज झाला. कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा सिनेमा दाखवण्यात आला. समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीही या सिनेमा पसंतीची पावती दिली. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी, तिग्मांशू धुलिया, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरैशी या कलाकारांनी भूमिका वठवल्या होत्या.
दिग्दर्शकांमध्येही टफ कॉम्पिटीशन, कोण बाजी मारणार ?
टफ कॉम्पिटीशन ! विद्या, करीना, प्रियांका, कोणाला मिळणार अवॉर्ड ?
टफ कॉम्पिटीशन ! शाहरुख, अजय की रणबीर, कोण मारणार बाजी ?
'आप हैं तो स्टार हैं' : अशाप्रकारे उदय झाला बॉलिवूडच्या 'अँग्री यंग मॅन'चा...