आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Unknown Facts: शशी यांची शिस्त इतकी होती की कुटुंबीय \'अंग्रेज कपूर\' नावाने बोलवायचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई :  अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी (4 डिसेंबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शसी कपूर यांनी 1961 मध्ये नायक म्हणून हिंदी चित्रपटांत पदार्पण केले. 160 चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांना 2011 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शशी यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते. पण त्यांनी शशी कपूर या नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे शशी यांना हे नाव इंडस्ट्रीने नव्हे तर त्यांच्या आईनेच दिले होते. त्यांच्या आईंना बलबीर राज हे नाव पसंत नव्हते. 

 

जाणून घेऊयात, शशी कपूर यांच्या आयुष्याशी निगडीत 10 रंजक किस्से....

 

किस्सा नंबर 1 - का पसंत नव्हते आईला बलबीर राज हे नाव...
- शशी यांच्या सावत्र आजीने त्यांना बलबीर राज कपूर हे नाव दिले होते. पंडिताच्या सांगण्यावरुन त्यांनी हे नाव ठेवले होते. शशी कपूर यांच्या मातोश्रींना या नावाची चिड होती. त्यामुळे त्या त्यांना बलबीर ऐवजी शशी या नावाने हाक मारु लागल्या. अशा प्रकारे बलबीर राज कपूर हे शशी कपूर झाले. 

 

किस्सा नंबर 2 - कपूर घराणे म्हणायचे ‘अंग्रेज कपूर’ तर राज कपूर म्हणायचे ‘टॅक्सी कपूर’

शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. अवघे कपूर घराणे त्यांना ‘अंग्रेज कपूर’ नावाने पुकारायचे. कारण शशी यांचे शिस्तबद्ध जीवन. इतकेच नाही तर शशी कपूर दिवसभरात 15 ते 18 तास शूटिंग करायचे. यामुळेच राज कपूर त्यांना ‘टॅक्सी कपूर’ नावाने बोलवायचे. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, शशी कपूर यांच्याशी निगडीत आणखी 8 किस्से... 

बातम्या आणखी आहेत...