आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवरच दिव्यांकाने सुरू केला भांगडा, जाणून घ्या काय होते सेलिब्रेशनचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी. - Divya Marathi
दिव्यांका त्रिपाठी.
मुंबई - ये है मोहब्बते या पॉप्युलर शोने 1000 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने कास्ट आणि क्रू मेंबर्स सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असल्याचे पाहायला मिळाले. सेटवर एक छोटासा केक कटींग सोहळाही झाला. त्यानंतर सेटवर सगळ्या अॅक्टर्ससह दिव्यंकाने जोरदार डान्स केला. डिसेंबर 2013 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये दिव्यंका त्रिपाठी आणि करण पटेल लीड रोलमध्ये आहेत.

एका मुलखतीत दिव्यंका म्हणाली की, इशिता भल्लाचे कॅरेक्टर घराघरात प्रसिद्ध झाले आहे. माझ्या कॅरेक्टरमध्येही अनेकवेळा बदल झाले आहेत. पण आजवरचे सगळे सीन मी खूप एन्जॉय केले. हा शो माझ्यासाठी खूप खास आहे. त्याचे कारण म्हणजे या शोमध्येच मला माझा लाइफ पार्टनर (विवेक दाहिया) मिळाला. पूर्ण कास्ट आणि सेट माझ्यासाठी घरासारखेच आहे. 1000 एपिसोड पूर्ण करणे हे आमच्यासाठी मोठे यश आहे. करण सेलिब्रेशनमध्ये दिसला नाही. नेहमी लेट येणारा करण यावेळीही उशीरा आल्याने अखेर त्याच्या शिवाय सेलिब्रेशन करण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'ये है मोहब्बतें' च्या 1000 एपिसोड्स पूर्ण होण्याच्या जल्लोषाचे PHOTOS..
सर्व फोटो : अजित रेडेकर.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...