आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीबरच्या कॉन्सर्टसाठी दिल्लीहून एकटीच आली ही 12 वर्षीय \'लिटील फॅन\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टीन बीबरच्या मुंबईमध्ये झालेल्या कॉन्सर्टसाठी एक 1 वर्षीय मुलगी एकटीच मुंबईला येऊन पोहोचली. अक्षिता राजपाल असे तिचे नाव आहे. ती जस्टिनची इतकी मोठी फॅन आहे की तिने त्याच्या आयुष्यावर एक बुकलेटही तयार केले आहे. दिल्लीमध्ये राहणारी अक्षिता एमिटी इंटरनॅशनल स्कुलमध्ये आठवीच्या वर्गात शकते.अक्षिताने अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' चित्रपटात एक लहानशी भूमिकाही केली आहे. 
 
आईवडीलही येणार होते सोबत पण..
 
अक्षिता या कॉन्सर्टमध्ये तिच्या आईवडिलांसोबत येणार बोती पण त्यांना कुठल्याशा महत्त्वाच्या कामामुळे येता आले नाही. पण अक्षिताला तिच्या आवडत्या बीबरचा शो कुठल्याही 
किमतीवर मिस करायचा नव्हता. म्हणून तिने एकटीने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. 
अक्षिताचे काका सांगतात की, अक्षिताने जस्टिन बीबरच्या आयुष्यावर आणि त्याच्या आवडीच्या गोष्टींचे बुकलेटही तयार केले आहे. अक्षिता प्रोफेशनल डांसरही आहे आणि जस्टिनच्या गाण्यावर डान्स करणे तिला फार आवडते. अक्षिता एसबीआई जनरल इंश्‍योरंस, कोडेक, बिरला सनलाइफ, फोर्टिस यांसारख्या कंपनीच्या जाहिरातीतही झळकली आहे.
 
अक्षिताचे वडिल लाजपत नगर येथे फॅशन रिटेल स्टोर चालवितात तर आई भावना प्रायव्हेट कंपनीत जॉब करते. 
 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अक्षिताचे काही निवडक फोटोज्...
 
 हे ही वाचा..
 
 
 
बातम्या आणखी आहेत...