Home »News» 14 Tv And Bollywood Celebs Committed Suicide Very Young Age

कास्टिंग डायरेक्टपूर्वी या 13 बॉलिवूड आणि TV सेलिब्रिटींनी केली आत्महत्या, हे होते कारण

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 16:29 PM IST

  • फोटो- मनोज नायर, सिल्क स्मिता, जिया खान

एकीकडे टीव्ही दिग्दर्शक तलत जानीच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्री शोककळा पसरली असतानाच 31 वर्षीय कास्टिंग डायरेक्टर मनोज नायरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार काल (10 अक्टूबर) मनोजने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण उघड झालेले नाही. मनोजने सुसाइड नोट लिहिलेली नाही. मोहनन नायर GlamourCalling कंपनीत मनोज कुमार असोसिएट कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. मागील वर्षी त्याने टीव्ही कर्मशिअल आणि टीव्ही कास्टिंग केले होते. याशिवाय त्याने 'सावधान इंडिया' या शोच्या कास्टिंगसाठीही काम केले होते. त्याचे आईवडील मुंबईत दाखल झाले असून मनोजचे पार्थिव केरळ येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

टीव्ही आणि सिनेसृष्टीत असे अनेक कलावंत आहेत, ज्यांचा मृत्यू आजही रहस्यच आहे. अनेक प्रकरणात त्यांच्या मृत्यूला आत्महत्येचे नाव देऊन केस बंद करण्यात आली आहे. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com वाचकांना आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवणा-या कलाकारांविषयी सांगत आहे...
सिल्क स्मिता
सिल्क स्मिताने यशाचा आनंद उपभोगला. मात्र अपयश ती पचवू शकली नाही. निर्माता म्हणून काम करत असताना तिला कोटींचे नुकसान झाले. असे म्हटले जाते, की त्रासून तिने 3 सप्टेंबर 1996 रोजी आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिच्या आत्महत्येच्या बातमीने दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. 18 वर्षे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्रीने रहस्यमयरित्या या जगाचा निरोप घेतला.
मनोज नायक, सिल्क स्मितासह ज्यांनी अगदी उमेदीच्या काळात जगाचा निरोप घेतला, जाणून घ्या अशा कलाकारांविषयी पुढील स्लाईड्समध्ये...

Next Article

Recommended