आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'ची 450 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत साऊथचे हे 15 सिनेमे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली' हा सिनेमा नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करतोय. 10 जुलै रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 450 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा दक्षिणेतील सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा आहे.
प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया स्टारर या सिनेमाने शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनला मागे टाकले आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'चा एकुण बिझनेस हा 422 कोटींच्या घरात होता.
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत शंभर कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस करणारा बाहुबली हा पहिला सिनेमा नाहीये. आत्तापर्यंत जवळजवळ 15 सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. मात्र 'बाहुबली'ने केलेल्या बिझनेस या सिनेमांपेक्षा बराच मोठा आहे.
Divyamarathi.com तुम्हाला साऊथ इंडियन सिनेसृष्टीतील (तामिळ आणि तेलगू) 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या सिनेमांविषयी सांगत आहे..
नोटः कमाईचे हे आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि वर्ल्डवाइड कलेक्शनवर आधारित आहेत...