आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1st Weekend: 'Airlift' Collects 44 Cr While 'Kya Kool Hain Hain 3' Reaches 20 Cr

1st विकेण्डलाच निघाला निर्मिती खर्च, 'Airlift' ने 44 तर 'KKHH3'ने कमावले 20Cr

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : गेल्या आठवड्यात आलेल्या खिलाडी अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली होती. भारताने 1991 साली पहिल्या आखाती युद्धाच्या वेळी केलेल्या बचाव कार्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही आता हिट झालाय. प्रदर्शित झालेल्या दिवसापासून हा सिनेमा भरपूर गल्ला जमवतोय.
रविवारपर्यंत या चित्रपटाने 44 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी म्हणजे रिलीज झालेल्या दिवशी या चित्रपटाने 12.35 कोटी कमावले. शनिवारी 14 कोटी रुपयांचा, तर काल 17.35 कोटी रुपयांचा बिझनेस या चित्रपटाने केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.
एकुणच या चित्रपटाचं वीकेण्ड कलेक्शन आहे 44.30 कोटी रुपये झाले आहे. हे अक्षय कुमारच्या
जानेवारी 2015 मध्ये आलेल्या 'बेबी'च्या वीकेण्ड कलेक्शनपेक्षाही (35.90 कोटी रुपये) जास्त आहे. याविषयी तरण आदर्श यांनी ट्विट केले, "#Airlift had EXCELLENT trending over the weekend. Received tremendous love from moviegoers, which explains the day-wise growth..." या सिनेमाचा निर्मिती खर्च 40 कोटी इतका आहे.
अक्षयच्या एअरलिफ्टने बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचं यशस्वी उड्डाण केलं, असं म्हणायला आता हरकत नाही.
'क्या कुल है हम 3' ची 20 कोटींची कमाई...
अॅडल्ट कंटेंट असूनदेखील 'क्या कुल है हम 3' ने पहिल्या आठवड्यात 20 कोटींचा गल्ला जमवला आहे. कलेक्शनची माहिती देताना तरण आदर्श यांनी लिहिले, , "#KyaaKoolHainHum3 Fri 8.15 cr, Sat 5.50 cr, Sun 6.50 cr. Total: 20.15 cr. India biz." तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि मंदाना करिमी स्टारर या चित्रपटाचा निर्मिती खर्च 20 कोटी इतका आहे.
पुढे वाचा, तरण आदर्श यांनी केलेले Tweets...