आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2002 Hit And Run Case: Salman Khan Did Not Possess A Driving License

Hit & Run Case: अपघातावेळी सलमानकडे नव्हता वैध परवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)
मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 2002मध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. सप्टेंबर 2002मध्ये सलमानवर मद्यपान करून वांद्र्याच्या फुटपाथवर झोपलेल्या 5 लोकांना कारने चिरडल्याला आरोप लागला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सोमवारी (16 फेब्रुवारी) हिट अँड रन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरटीओच्या एका अधिका-याने याबाबत साक्ष देऊन सांगितले, 'गाडी चालवताना सलमान खानकडे वैध परवाना नव्हता.'
साक्ष नोंदवताना आरटीओ अधिका-याने सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी डब्लू देशपांडे यांनी सांगितले, की 2002 मध्ये त्याच्या वाहन चालवण्याच्या परवान्याचे 2004 मध्ये नूतनीकरण झाले. सलमानच्या परवान्याची नोंदसुध्दा न्यायालयात सादर करण्यात आली, यामुळे सलमान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
दुसरा साक्षीदार अर्थातच एका पोलिस उपनिरीक्षकांनी न्यायालयात सांगितले, की या प्रकरणात सलमानला रक्त तापसणीसाठी जे जे रुग्णालयात डॉक्टक शशिकांत पवार यांच्याकडे नेण्यात आले होते. जेणेकरून माहित व्हायला हवे, की सलमानने मद्यपान केले आहे, की नाही.
हिट अँड रन प्रकरणाच्या या सुनवाणीत कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी (16 फेब्रुवारी) दोन्ही साक्षीदारांची चौकशी केली. आतापर्यंत 20पेक्षा जास्त साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून काहीजणांची चौकशी करणे बाकी आहे.