आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या भूकंपामध्ये तेलुगू अभिनेता के. विजयचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- नेपाळच्या भूकंपामध्ये तेलुगू सिनेसृष्टीतील 25 वर्षीय अभिनेता के. विजय याचा मृत्यू झाला आहे. 'एतकरम. कॉम' या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो नेपाळला गेला होता. सिनेमाचे संपू्र्ण युनिट भूकंपाच्या तावडीत सापडे असून 20 जण सुरक्षित असल्याचे समजते. के. विजयची कार भूकंपामध्ये उलटली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कारमधील इतर तिघे जखमी झाले आहेत.

के. विजय मुळचा आंध्रप्रदेशचा रहिवासी होता. तो नृत्य दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता. आता त्याच्या मृत्यूनंतर तेलुगू सिनेसृष्टीनं विजयचे पार्थिव घरी आणण्यासाठी सरकारला साकडे घातले आहे.