आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2,500 Year Old Kingdom Was Recreated For Rajamouli’S Baahubali

कासवांच्या कातड्यांपासून बनलेले शस्त्र आणि बनावट धबधबे, वाचा 'बाहुबली'ची पडद्यामागची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. शुक्रवारी (10 जुलै) या सिनेमाने 60 कोटींची कमाई केली. ही बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सर्वाधिक कमाई मानली जात आहे. आतापर्यंत सिनेमाचे कलेक्शन 160 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. मात्र, हे कलेक्शन 10 भाषांचे (तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदी) मिळून झाले आहे. केवळ कमाईच्या बाबतीतच नव्हे आतापर्यंत सर्वात मोठे बजेट आणि महागडा सिनेमा असल्याचा टॅगसुध्दा मिळाला आहे. शिवाय जगातील सर्वात मोठ्या पोस्टरचा रेकॉर्डसुध्दा 'बाहुबली'च्या नावी नोंद झाला आहे.
राजामौलीने या सिनेमाच्या निर्मितीसाठी खूप कष्ट घेतले, याचा अंदाजा सिनेमा पाहूनच येतो. सिनेमाची कहानी 2500 वर्षांपूर्वीच्या एका काल्पनिक राज्य माहेष्मतीची आहे. याचा सेट निआग्रा फॉल्स ऑप इंडियाच्या नावाने प्रसिध्द केरळचे पर्यटनस्थळ अथिरपल्ली फॉल्स येथील आहे. जे दक्षिण फिल्म सिटीमध्ये तयार करण्यात आले होते. सिनेमात युध्दासाठी वापरलेल्या शस्त्रासाठी कासवांच्या कातडीचा वापर करण्यात आला आहे. जे प्राणी यात दाखवण्यात आले आहेत, ते सर्व मशीनव्दारे तयार करण्यात आले आहे.
सिनेमाचे कलादिग्दर्शक साबू सायरिलने divyamarathi.coसोबत खास बातचीत करून सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी शेअर केल्या. ते सांगतात, सिनेमानिमित्त त्यांची पहिली भेट मुंबई वांद्र्याच्या ताज लँड अँड हॉटेलमध्ये झाली होती. 'हा प्रोजेक्ट एक मोठा टास्क होता. परंतु आव्हानात्मकही होता. 2012मध्ये मी हा सिनेमा साइन केला आणि 2013पासून काम करण्यास सुरुवात केली. 380 दिवसांत सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले.' साबू सायरिल यांनी सिनेमाविषयी आणखी काय-काय सांगितले जाणून घ्या...
2500 जून्या राज्याची निर्मिती-
राजामौली यांच्या सांगण्यानुसार, 2500 वर्षे जूने राज्य तयार करायचे होते. साबू सांगतात, 'राजामौली यांनी अशा शहराची मागणी केली तेव्हा डोक्यात रोमचे नाव आले, परंतु सिनेमात भारतीय स्पर्श हवा होता. त्यानंतर अजिंठा लेणीचा विचार करण्यात आला आणि एक काल्पनिक राज्य बनवण्यास सुरुवात झाली.'
काल्पनिक प्राण्यांची निर्मिती-
'बाहुबली' एक ऐतिहासिक सिनेमा आहे, त्यामुळे अॅक्शन सीनमध्ये घोडे, हत्तीसारखे प्राणी घेणे आवश्यक होते. सायरिल यांच्या सांगण्यानुसार, 'आम्हाला युध्दाच्या सीक्वेन्समध्ये प्राण्यांना खाली कोसळाताना, जखमी होताना दाखवायचे होते. असे ख-या आणि जिवंत प्राण्यांसोबत करणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही हत्ती, घोडे, जंगली अस्वल, पाणघोडे आणि एका मोठ्या सापाला मॅकॅनिकल मॉडेल्सच्या माध्यमातून रिप्लेस केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी...'