आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीच्या तिकिटासाठी हैदराबादेत 3 किमी रांगा, दिल्लीत तिकिटाचे दर 2400 वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/नवी दिल्ली - अवघ्या काही तासांनंतर बाहुबली नावाचे वादळ जगभरातील थिएटर्समध्ये अवतरणार आहे. पण त्याआधीच या वादळाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. पहिल्या चित्रपटाच्या अपार यशानंतर आता बाहुबलीच्या दुसऱ्या भागाची लोकप्रियताही शिगेला पोहोचली आहे. हैदराबादेत तर चित्रपटाचे तिकिट मिळवण्यासाठी तब्बल तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. चाहते तिकिट मिळवण्यासाठी एका थिएटरमधून दुसर्या थिएटरमध्ये चकरा मारत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. तर दिल्लीमध्ये बाहुबलीच्या तिकिटांचे दर 2400 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले आहे. 
 
सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या तिकिटासाठी लावलेल्या रांगेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही रांग जवळपास तीन किलोमीटर लांबीची आहे. हैदराबाच्या नेकलेस रोडवरील प्रसाद आयमॅक्ट या मल्टीप्लेक्सबाहेर ही रांग लागलेली आहे. विशेष म्हणजे सकाळी सात वाजेची ही परिस्थिती होती. यात तिकिट न मिळालेल्या अनेक चाहत्यांनी धावपळही झाली. या शिएटरमध्ये तिकिट नाही, मिळाले तर लगेचच दुसऱ्या थिएटरमध्ये जाऊन तिकिट मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 

तिकिटांना असलेली मागणी पाहता तिकिटांचे दर 600 पर्यंत जात असल्याचेही समोर आले आहे. तर दिल्लीमध्ये काही तिकिटे 2400 रुपयांपर्यंत विकली गेली असल्याचीही चर्चा आहे. जगभरात सुमारे 7500 हून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट झळकणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, तिकिटासाठी लागलेल्या रांगांचे Photos आणि व्हिडीओ..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...