आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day : 34 वर्षांची झाली सनी लियोन, पाहा तिचे मन मोहून घेणारे 34 वेगवेगळे अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी लिओन)
मुंबई - पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सनी लियोन 34 वर्षांची झाली आहे. सनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा असे आहे. 13 मे 1981 रोजी ओंटारियो (कॅनडा) येथे सनीचा जन्म झाला. सनी इंडो-कॅनेडियन आणि अमेरिकन अभिनेत्री आहे. याशिवाय मॉडेल म्हणूनही तिला ओळखले जाते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी सनीला लोक पोर्न स्टार म्हणून ओळखत होते. पोर्नोग्राफीशिवाय ती मेनस्ट्रीम सिनेमे आणि टीव्ही शोजमध्येही झळकली आहे.
2010 मध्ये मॅक्सिम मॅगझिनने सनीला जगभरातील टॉप 12 पोर्न स्टार्सच्या यादीत स्थान दिले होते. 2012मध्ये सनीने पूजा भट्टच्या 'जिस्म 2' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर तिची भेट प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट यांच्यासोबत झाली होती. त्यांनीच सनीला बॉलिवूडमध्ये पहिली संधी दिली.
'जिस्म 2' नंतर सनी 'जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमांमध्ये झळकली. एकता कपूर प्रॉडक्शनचा 'रागिनी एमएमएस 2' हा सनीचा पहिला हिट बॉलिवूड सिनेमा आहे. सनी सोशल मीडियावरसुद्धा अॅक्टिव आहे. ट्विटर, फेसबूक आणि इंस्टाग्रामवर वेळोवेळी आपली छायाचित्रे शेअर करत असते.
आज सनीच्या 34 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिचे 34 वेगवेगळे अंदाज दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सनीची खास छायाचित्रे...