गोव्यात 46 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) सुरू झाला असून या महोत्सवातील घडामोडी, चर्चासत्रे व रसिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चित्रपट समीक्षक व अभ्यासक शशिकांत सावंत देत आहेत…
23 नोव्हेंबरच्या दिवसाचे हिरो होते शाम बेनेगल. त्यांची मुलाखत दुसऱ्या तेवढाच तोलामोलाचा दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी घेतली. शाम बाबूलनाथ यांना त्यांनी विविध विषयांवर बोलत केले.
अगदी स्मिता पाटील ते आजच्या दिग्दर्शकांपर्यंत. स्मिता पाटीलमध्ये विशेष असे काय आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी एका वाक्यात दिले. ‘कॅमेरा लव्हड हर.’ त्यांनी असं म्हटलं की, ''स्मिता पाटील ही आतून काम करणारी अभिनेत्री होती. उलट, शबाना आझमी स्क्रिप्टची भरपूर पूर्व तयारी करून काम करायची. ती बऱ्याच अंगाने काम करायची व प्रश्न विचारायची. उलट स्मिताला पूर्ण कथानकात ‘मी कुठे असणार आहे?’ एवढं सांगितलं तरी पुरायचं. ती स्वत:ची देहबोली त्याप्रमाणे अॅडजस्ट करायची.''
सुधीर मिश्रांनी त्यांना विचारले, ''तुम्ही त्याच त्याच मंडळीसोबत काम करता’ त्यावर शाम म्हणाले, मी 30 वर्ष तेचतेच लेखक घेऊन काम केले. याचा फायदा असा होतो की कॅमेरापासून अॅक्टरपर्यंत अनेक मंडळी सिनेमा बनव्यात असे योगदान देतात. परिणामी, माझ्या मनातला सिनेमा आणि पडद्यावरचा सिनेमा यांत चांगल्या अर्थाने फरक पडतो. ज्या अभिनेत्यांसोबत काम केले. त्यांना केवळ थोडीशी कल्पना दिली तरी ते उत्तम अभिनय करतात हा माझा अनुभव आहे.''
भारतीय सिनेमा एवढा का घाबरतो? त्यावर ते म्हणाले, ''पडद्यावर जर शांतता दाखवली तर कित्येकांचे डोके भिरभिरते किंवा ते सिनेमापासून दूर जावू शकतील अशी भीती दिग्दर्शकांना वाटते. अर्थात, चांगले दिग्दर्शक यावर मात करुन चांगला सिनेमा बनवू शकतात.''
‘पंडूरा’ सिनेमाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला, ते म्हणाले, ''हा सिनेमा मी दोन भाषांत बनवला. त्यातील फक्त तेलुगू सिनेमा रिलीज होऊ शकला. हिंदी सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. दोन भाषांत सिनेमे बनवणे चुकीचे आहे हे माझ्या लक्षात आले. कारण एखाद्या दृश्याचे अनेक टेक घेतले जातात पण त्या सर्वांमध्ये सर्वोत्कृष्ट टेक एकच असतो. दोन भाषांतला सिनेमा बनवताना कधी तेलुगूतला तर कधी हिंदीतला चांगला असायचा त्यामुळे निवड करताना कठीण जायचे.' '
‘पुढचा शाम बेनेगल कोण?’ असा प्रश्न विचारला असता, शाम बेनेगल यांनी कोणती प्रतिक्रिया दिली, वाचा पुढील स्लाईडमध्ये...