आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आजाराने आतून खंगतात लोक, या 5 सेलिब्रिटींची झाली अशी वाईट अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे फोटोत - निशा नूर एड्स होण्यापूर्वी एवढी सुंदर दिसत होती. एड्स झाल्यानंतर तिची झालेली अवस्था तुम्ही उजवीकडील फोटोत बघू शकता. - Divya Marathi
डावीकडे फोटोत - निशा नूर एड्स होण्यापूर्वी एवढी सुंदर दिसत होती. एड्स झाल्यानंतर तिची झालेली अवस्था तुम्ही उजवीकडील फोटोत बघू शकता.

आज जागतिक एड्स दिन. अवघ्या जगाला हा आजार विळखा घालू पाहतोय. जगभरात आजही लाखो लोक या आजाराने मृत्युमूखी पडत आहेत. भारतातही या आजाराचे प्रमाण बरेच मोठे आहे. संशोधकांचे संशोधन सुरू आहे. परंतू, आजतरी या आजारावर कोणतीही लस अथवा उपचार उपलब्ध नाही. आजवर केवळ शहरांमध्ये दिसून येणारा हा आजार देशातील खेड्यापाड्यांसह कानकोपऱ्यात पसरलाय. या आजारामूळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. होत आहेत. मानवी समाजासमोर आव्हान निर्माण केलेल्या या आजाराबाबत जनजागृती करणे हा एकमेव उद्देश ठेऊन 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. 


एड्समुळे झाला होता निशा नूरचा मृत्यू...
तामिळ अभिनेत्री निशा नूरने कल्याण अगाथिकल आणि अय्यर दि ग्रेट या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तामिल, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये ती झळकली. 1980 ते 1986 पर्यंत तिचे करिअर यशोशिखरावर होते. पण त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केले. 2007 साली एड्समुळे निशाचा मृत्यू झाला. एड्स आजाराविषयी तिला समजले नव्हते, असे म्हटले जाते. शेवटच्या काळात तिची देखभाल करणारी एकही व्यक्ती तिच्या जवळ नव्हती. मृत्यूपूर्वी निशा अतिशय खंगली होती. तिची अवस्था एवढी वाईट झाली होती, की तिच्या शरीरावर किडे, मुंग्या लागल्या होत्या.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या अशा स्टार्सविषयी जे एड्सचे बळी ठरले...  

बातम्या आणखी आहेत...