आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण: ‘कासव’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी विज्ञान भवनात  शानदार कार्यक्रमात करण्यात आले. ‘कासव’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दशक्रिया’या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘सायकल’, ‘व्हेंटिलेटर’, ‘आबा ऐकताय ना ?’ या मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाले असून मराठी मोहर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ठळक दिसून आली.

६४ व्या भव्य राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  प्रदान सोहळ्यास केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे सचिव राजीव गोबा, तसेच विविध श्रेणीतील चित्रपट निवड मंडळाचे प्रमुख मंचावर उपस्थित होते. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात येते.यावर्षी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुरभी सी.एम. यांना ‘मिन्नामिनुनगू द फायरफ्लाय’ या मल्याळम चित्रपटासाठी तसेच उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अक्षय कुमार यांना  ‘रुस्तम’ या हिंदी चित्रपटासाठी  प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि ५० हजार रुपये रोख असे आहे. देशभरातील विविध भाषेतील चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. या चित्रपटाची निर्मिती मोहन आगाशे, सुमित्रा भावे आणि सुनील सुकठणकर यांनी केलेली आहे. पुरस्कार स्वरूपात प्रत्येकाला सुवर्ण कमळ आणि २ लाख ५० हजार रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
 
‘दशक्रिया’चे दिग्दर्शक संदीप पाटील, रजत कमळ तर  याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार प्रसिद्ध चरित्र अभिनेते मनोज जोशी यांना प्रदान करण्यात आला.‘सायकल’ या मराठी चित्रपटातील वेशभूषाकारासाठी सचिन लोवलेकर यांना रजत कमळ,५० हजार रुपये रोख या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
साउंड डिझायनर ते चित्रपट निर्मितीपर्यंतचा प्रवास
भारतातील सर्वात प्रचलित चित्रपट निर्मित्यापैकी के. विश्वनाथ यांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते.  विश्वनाथ यांच्या निर्मित  चित्रपटांमधून सामाजिक प्रश्न, संस्कृती तसेच समृद्ध पंरपरेचे भान जपले जायचे.  त्यांनी साउंड डिझायनर म्हणून सुरुवात केली होती.  

अक्षय कुमार-सोनम ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री 
अक्षय कुमारला 'रुस्‍तम' या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्‍कृष्‍ट तर सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'नीरजा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्‍कृष्‍ट कन्‍नड चित्रपट 'रिसर्जवेशन'ची निवड झाली. उत्‍तर प्रदेशला 'मोस्‍ट फिल्‍म फ्रेंडली स्‍टेट'च्‍या दृष्‍टिने निवडण्‍यात आले. तर नागेश कुकनूर यांचा चित्रपट 'धनक'ला सर्वोत्‍कृष्‍ट बाल चित्रपट म्‍हणून निवडण्‍यात आले. गतवर्षी सर्वांधिक कमाई केलेल्‍या 'दंगल' चित्रपटातील लहान बबीताची भूमिका करणारी काश्‍मीरी अभिनेत्री जायरा वसीमला बेस्‍ट सपोर्टिंग अॅक्‍ट्रेससाठी निवडण्‍यात आले. 
 
अक्षय कुमारला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार 
26 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेता अक्षय कुमाराला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. 'रुस्तम' सिनेमातील अक्षयच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.  
 
आईवडिलांसोबत पोहोचली सोनम..
- सोनम कपूर तिचे आईवडील अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाली आहे. 
- सोनम म्हणाली, "खूप छान वाटतंय. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मला हा पुरस्कार मिळेल, याची अपेक्षा नव्हती. मी गेल्या काही वर्षांपासून इश्यू बेस्ड सिनेमांवर काम करतेय. या पुरस्कारने मला आणखी चांगले काम करण्याचे बळ मिळाले आहे."
 
विशेष लक्षवेधी चित्रपट पुरस्कार -  नीरजा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) - कासव
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेता - अक्षय कुमार (रुस्तम) 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मनोज जोशी ( दशक्रिया) 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर ) 
सर्वोत्कृष्ट सहकलाकार  - मनोज जोशी - 'दशक्रिया' 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - आधारित पटकथा - 'दशक्रिया' 
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया. दिग्दर्शक -संदीप भालचंद्र पाटील
सर्वोत्कृष्ट एडिटिंग पुरस्कार -  व्हेंटिलेटर 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सायकल 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट संकलन - व्हेंटिलेटर
 
पुढील स्लाइडवर पाहा 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...