आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच नव्हे हे सेलेब्सही अडकले आहेत गंभीर आरोपात, भोगला आहे तुरुंगवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान, संजय दत्त)
मुंबई- अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकराची आज अखेरची सुनावणी आहे. सलमान तुरुगात जाणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. सलमानच्या कुटुंबीयासोबत सर्व जगाचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 28 सप्टेंबर 2002 रोजी लँड क्रूजर गाडीने रात्रीच्या दोन वाजता वांद्र्यातील घरी जात असताना अमेरिकन बेकरीजवळ सलमानच्या गाडीने फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
कोर्टाने या प्रकरणात एकून 27 लोकांचे जबाब नोंदवले होते. त्यामध्ये डॉक्टरांपासून सलमानच्या ड्रायव्हरपर्यंत सर्वांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. डॉक्टर शशिकांत पवार यांनी सलमानच्या रक्त चाचणी केली होती. सलमानच्या रक्तात दारूचे अंश नव्हते असे शशिकांत पवार यांनी सिध्द केले. सलमानचा ड्रायव्हर अशोकने कोर्टात साक्ष देताना सांगितले होते, की घटनेवेळी सलमान गाडी चालवत नव्हता, गाडी तो स्वत: चालवत होता आणि सलमान त्याच्या बाजूच्या सीटवर बसला होता. सलमाननेसुध्दा कोर्टात असेच सांगितले होते, की घटनेवेळी तो गाडी चालवत नव्हता. या प्रकरणात सलमान दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेत काळवीट शिकार प्रकरणातसुध्दा सलमानने दोनवेळा जोधपूरमध्ये तुरुंवास भोगला होता. सलमान खान एकमेव असा स्टार नाहीये, ज्याने तुरुगांत वेळ घालवला आहे. सलमानपूर्वीसुध्दा अनेक कलाकार वादात अडकून तुरुंगात गेले आहेत.
संजय दत्त-
संजय दत्त 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणातंर्गत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा मिळाली आहे. त्यामध्ये 18 महिन्यांची शिक्षा संजयने पूर्वीच पूर्ण केली होती. शिल्लक असलेली शिक्षा भोगण्यासाठी (42 महिने) संजयला मे 2013मध्ये पुन्हा तुरुंगात पाठवले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या वादात अडकून बॉलिवूड सेलेब्स गेले आहेत तुरुंगात...