आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Crew Members From Upcoming Mugdha Godse Film Die In Nepal Earthquake

नेपाळच्या भूकंपात मुग्धा गोडसेच्या आगामी सिनेमातील आठ क्रू मेंबर्सचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नेपाळ येथील पोखरा येथे मुग्धा गोडसे आणि रुस्लान यांच्या आगामी सिनेमाचे शूटिंग सुरु होते. मुग्धा आणि रुस्लानचे पोखरा येथील शूटिंग स्थळावरचे हे छायाचित्र आहे.)
नवी दिल्लीः नेपाळमधील विनाशकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 15 हजारांवर जाण्याची भीती संयुक्त राष्‍ट्राने (युएन) व्यक्त केली आहे. दुसरीकडे, आज (मंगळवार) पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेपाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु, पावसामुळे मदतकार्यात अनेकदा अडथळा निर्माण होत आहे.
या विनाशकारी भूकंपात फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तेलगू अभिनेता के. विजयच्या निधनाच्या बातमीनंतर आता मुग्धा गोडसेच्या आगामी सिनेमातील आठ क्रू मेंबर्सचा या भूकंपात मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे शूटिंगसाठी हे सर्वजण आले होते.
मुग्धाने ट्विटरवरुन ही दुःखद बातमी दिली. ही बातमी खूप धक्कादायक असून येथून काही दिवसांपूर्वीच शूटिंग संपवून आपण भारतात परतल्याचे तिने सांगितले. अभिनेता रुस्लान मुमताज आणि मुग्धाची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी सिनेमाचे शूटिंग नेपाळमध्ये सुरु होते. पोखरा येथे हे शूटिंग सुरु होते. पुढील काही भागांच्या शूटसाठी हे क्रू मेंबर्स नेपाळमध्येच थांबले होते. मात्र या भूकंपात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
एका दिवसापूर्वीच तेलगू अभिनेता के. विजयच्या मृत्यूची बातमी आली. 'एतकरम. कॉम' या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो नेपाळला गेला होता. के. विजयची कार भूकंपामध्ये उलटली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कारमधील इतर तिघे जखमी झाले आहेत. के. विजय मुळचा आंध्रप्रदेशचा रहिवासी होता. तो नृत्य दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता. आता त्याच्या मृत्यूनंतर तेलुगू सिनेसृष्टीनं विजयचे पार्थिव घरी आणण्यासाठी सरकारला साकडे घातले आहे.
पुढे वाचा, मुग्धा गोडसेचे ट्विट...