आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100% तर एअर इंडियात 49% FDI ला केंद्र सरकारची मंजूरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने बजेटच्या आधी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत थेट परकीय गुंतवणूकी (एफडीआय) संदर्भात मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. सिंगल ब्रंड रिटेल आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये ऑटोमॅटिक रुटने 100% तर एअर इंडियामध्ये 49% एफडीआयला मंजूरी देण्यात आली आहे. 


कोण-कोणत्या क्षेत्रात दिली मंजूरी...


1) सिंगल ब्रँड रिटेल 100% मंजूरी 

- कॅबिनेटने बुधवारी सिंगल ब्रँड रिटेलमध्ये ऑटोमॅटिक रुटने 100% परकीय गुंतवणुकीला मंजूरी दिली आहे. सरकारने 2010 मध्ये सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 49% एफडीआयला मंजूरी दिली होती. यानंतर विदेशी रिटेल कंपन्यांनी भारतीय बाजरपेठेत प्रवेश केला होता. 
- आता सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100% एफडीआयचा अर्थ आता विदेशी कंपन्यांना क्लियरन्सच्या प्रोसेसमधून जावे लागणार नाही. 


2) एअर इंडियामध्ये 49% एफडीआयला मंजूरी 

- केंद्रीय कॅबिनेटने एअर इंडियामध्ये 49% एफडीआयच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. 
- एअर इंडियाला तोट्यातून वर काढण्यासाठी सरकार डिसइन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग करत होते. 
- सध्या एअर इंडियावर एकूण 52,000 कोटी रुपये कर्ज आहे. यातील 22,000 कोटी फक्त एअरक्राफ्ट खरेदीचे लोन आहे. उर्वरीत वर्किंग कॅपिटल लोन आणि दुसऱ्या महत्त्वाच्या गरजांसाठीचे आहे. 
- यूपीए सरकारने एअर इंडियाला 10 वर्षांसाठी बेलआऊट पॅकेज दिले होते. त्याअंतर्गत एअर इंडियाला 30,213 कोटी रुपेय मिळणार होते. त्यासाठी एक अट सरकारने ठेवली होती, एअर इंडियाला त्यांच्या कारभारात सुधारणे करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी निश्चित मानकांनुसार कामगिरी केलेली नाही. 


3) कन्स्ट्रक्शनमध्ये 100% एफडीआय

- कॅबिनेटने स्पष्ट केले आहे की रियल इस्टेट ब्रोकिंग सर्व्हिस  ही रियल इस्टेट बिझनेसमध्ये येत नाही. त्यामुळे रियल इस्टेट ब्रोकिंग सर्व्हिसमध्ये ऑटोमॅटिक रुटने 100% एफडीआयला मंजुरी दिली जात आहे. 


या निर्णयाचा शेअर बाजारावर काय परिणाम?
- केंद्रीय कॅबिनेटच्या या निर्णयानंतर एव्हिएशन कंपन्यांच्या शेअरमध्ये 3% तेजी निर्माण झाली आहे. इंडिगोचा शेअर 1.12% आणि जेट एअरवेजच्या शेअरने 2.25%  उसळी घेतली आहे. तर, त्याचवेळी स्पाइसजेटच्या शेअरमध्ये 1.60% घसरण झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...