आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अजीब दास्ता हैं ये...\' या गाण्यासोबतच अनेक गाणी ठरली हिट, शम्मी यांचे प्रसिध्द Songs

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीनंतर अजून एक अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. अभिनेत्री शम्मी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी 'उस्ताद पेड्रो' चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट 1949 मध्ये रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन यांनीही त्यांना आफल्या ट्वीटवर अकाउंटवरुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले की, 'Shammi Aunty .. prolific actress, years of contribution to the Industry, dear family friend .. passes away ..!! A long suffered illness, age .. Sad .. slowly slowly they all go away ..' 

आशा पारेख घेत होत्या शम्मी यांची काळजी
अभिनेत्री आशा पारेख शम्मी यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या. त्या त्यांची काळजी घेत होत्या. तर वहीदा रहमान, नरगिस दत्तही त्यांच्या चांगल्या मैत्रिण होत्या. त्यांनी 'इल्जाम' (1954), 'पहली झलक' (1955), 'बंदिश' (1955), 'आजाद' (1955), 'घर संसार' (1958), 'कुली नंबर 1' (1991), 'हम' (1991), 'मर्दो वाली बात' (1998), 'गुरुदेव' (1990), 'गोपी किशन' (1994), 'हम साथ-साथ है' (1999) सोबतच अनेक चित्रपटात काम केले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'शिरीन फरहाद की तो निकल पड़ी थी' हा होता. हा चित्रपट 2013 मध्ये आला.

 

हे गाणे ठरले हिट...

- 'अजीब दासता है ये...' हे गाणे खुप प्रसिध्द झाले. 1960 मध्ये आलेल्या 'दिल अपना और प्रित पराई' या चित्रपटातील हे गाणे आहे. 

- 'बडे अरमान से रखा है बलम तेरी कसम' हे गाणेही अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करते. 1951 मध्ये आलेल्या 'मल्हार' चित्रपटातील हे गाणे आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शम्मी यांचे प्रसिध्द गाणे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...