आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3 तास बाल्कनीमध्ये लॉक झाली होती ही अॅक्ट्रेस, मच्छरांमुळे झाली अशी अवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस एली अवरामसाठी सोमवारची रात्र अत्यंत त्रासदायक ठरली. ती बाल्कनीमध्ये बसली होती आणि अचानक तिच्या घराचा दरवाजा लॉक झाला. फार वेळ प्रयत्न केल्यानंतरही तिच्याकडून दरवाजा उघडला गेला नाही. यादरम्यान मच्छरांनी तिला चांगलाच त्रास दिला. 


3 तासांनी निघाली बाहेर 
- एलीने सांगितले की, तिने मदतीसाठी मोलकरणीला 10 वेळा कॉल केला. 
- एवढ्या वेळा कॉल केल्यानंतर अखेर तिच्या मोलकरणीने तिचा कॉल रिसिव्ह केला आणि तिला बाहेर निघता आले. 
- बाल्कनीतील लाईटही बंद होता. त्यामुळे तिला अंधारातच राहावे लागले. 
- मोलकरणीला एवढे फोन केल्याने तिच्या फोनची बॅटरीही लो झाली होती. 


कोण आहे एली.. 
एली अवराम स्वीडनची आहे. टीव्ही शो बिग बॉसमध्ये ती झळकली आहे. 2013 मध्ये ती या शोची कंटेस्टंट होती. तर 2014 आणि 2015 मध्ये तिने याठिकाणी गेस्ट अपिअरन्स दिला होता. एलीने मिकी व्हायरलद्वारे बॉलुवूड में डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'किस किस को प्यार करूं', 'पोस्टर बॉइज' आणि 'नाम शबाना' सारख्या चित्रपटात झळकली होती. लवकरच ती तमिळ आणि कन्नड चित्रपटांतही झळकणार आहे. 


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एलिचे PHOTOS आणि Video 

बातम्या आणखी आहेत...