आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली या कायद्याबद्दल नाराजी, म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगवर 60 वर्ष जुन्या कॉपीराईट कायद्याबद्दल प्रश्न उपस्थित करत हा कायदा निरपयोगी असल्याचे मत व्यक्त केले आहे. 1957 च्या कॉपीराईट अॅक्टप्रमाणे साहित्य, कला, संगीत हे कलाकारांच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी खुले होतात. अभिताभ यांचे म्हणणे आहे की, लेखकाच्या रचना या कालातीत असतात. त्याच्या मृत्यूनंतरही त्या त्याच्याच असतात. अशात 60 वर्षांची मर्यादा योग्य आहे का? 60 वर्षच का अनंतकाळासाठी कॉपीराईट का नको? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

अभिताभ म्हणाले, बाबूजींच्या लिखाणावर फक्त माझा हक्क

अमिताभने लिहिले आहे की, कोणतीही रचना ही फक्त लेखकाचीच असते पण 60 वर्षांनंतर ती सार्वजनिक होते. यात कोणत्या बौध्दिक संपदेचे रक्षण होते.
- माझा या कायद्यास त्यामुळेच आक्षेप आहे.
- अभिताभ म्हणाले की, बाबूजींचे लेखन हे मला वारसा हक्काने मिळाले आहे. त्यावर माझा कायमच हक्क असेल.
- माझ्या वडिलांच्या लिखाणाचा केवळ मीच वारसदार असल्याने माझा कॉपीराईट अॅक्टला विरोध आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...