आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीची हेरगिरी करण्याचा आरोप, चौकशीसाठी अनुपस्थित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महाराष्ट्रातील ठाणे क्राइम ब्रांचने कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकीची चौकशी करण्याचे आदेश काढले आहे. सिद्दीकीवर त्याच्या पत्नीची हेरगिरी करण्याचे आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांनी सीडीआरच्या बाबतीत 11 लोकांना, विशेषतः जवळच्या हेरगेरांना ताब्यात घेतल्यानंतर सिद्दीकीचे नाव समोर आलेय.


पत्नीच्या हालचाली आणि कॉन्टॅक्ट्सवर नजर ठेवल्याचा आरोप
- काही आरोपींनी दिलेल्या जबाबानुसार, सिद्दीकीने एका वकीलामार्फत एका हेराला पत्नीच्या मागे लावले होते. यानंतर त्याने पत्नीच्या फोनचे सीडीआर मिळवले होते. पत्नीच्या हालचाली आणि कॉन्टॅक्ट्सवर नजर ठेवता यावे यासाठी त्याने असे केले होते. परंतू नवाजुद्दीनने पत्नीची हेरगिरी का केली हे समोर आलेले नाही. पोलिस सध्या या गोष्टीचा तपास करत आहेत.

 

बॉलिवूडच्या अनेक सेलेब्ससोबत व्यावसायिक आणि पोलस ऑफिसरर्सचे नावही
- ठाण्याच्या क्राइम ब्रांचचे सीनियर पोलिस इंस्पेक्टर नितिन ठाकरे यांनी सांगितले की, "एका आरोपीने विचारपूस केल्यावर सिद्दीकीचे नाव घेतले होते. आम्ही सिद्दीकीला बोलावले, पण तो उपस्थित झाला नाही. यासोबतच या प्रकरणात आरोपींनी अनेक बॉलिवूड सेलेब्सचे नाव घेतले आहे. यासोबतच अनेक व्यावसायिक आणि पोलिक ऑफिसरर्सचे नावही यात आहे. यांची लवकरच विचारणा केली जाईल."

 

नवाजुद्दीनने दिले असे स्पष्टीकरण
- नवाजुद्दीन वर लावलेल्या आरोपांविषयी त्याने स्पष्टीकरण दिलेय. तो म्हणाला की, "काल संध्याकाळी मी माझ्या मुलीला तिच्या शाळेच्या एका प्रोजेक्टसाठी मदत करत होतो. आज सकाळी यासाठीच मी तिच्या शाळेत प्रोजेक्ट प्रदर्शनासाठी गेलो. तिथे माध्यमांनी माझ्यावर काही आरोप लावले. हे सर्व खुपच हैराण करणारे होते."


यापुर्वीही वादात अडकला आहे नवाजुद्दीन
नवाजुद्दीन सिद्दीकी हा 'एन ऑर्डिनरी लाइफ' या त्याच्या 25 ऑक्टोबरला लॉन्च झालेल्या पुस्तकामुळे वादात अडकला होता. येवढेच नाही त्याच्याविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याने आपले पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर नवाजुद्दीनने माफी मागितली होती. तो म्हणाला होता की, "माझ्या पुस्तकामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर माफी असावी. मला खुप पाश्चाताप होतोय. यामुळे मी हे पुस्तक लॉन्च न करण्याचा निर्णय घेतलाय." या ट्वीटच्या 24 तासांनंतर ऑनलाइन रिटेलर अमेजॉनने हे पुस्तक काढून टाकले होते.

 

या 14 चाप्टरच्या पुस्तकात काय होते?
- आपल्या बायोग्राफीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने 'मिस लव्हली' मधील को-स्टार निहारिका सिंहसोबतचे फिजिकल रिलेशन मान्य केले होती. यासोबतच त्याने खुलासा केला होता की, तो पहिल्यांदा निहारिकाच्या घरी गेल्यानंतर डायरेक्ट तिच्या बेडरुमपर्यंत गेला होता आणि नंतर नाते कायम केले.
- परंतू निहारिकासोबतचे हे नाते फक्त दिड वर्षातच मोडले. कारण याकाळात नवाजुद्दीन निहारिकासोबतच सुजैन नावाच्या यहूदी मुलीला डेट करत होता आणि निहारिका सिंहला ही गोष्ट कळाली होती.

 

कोण आहे नवाजुद्दीन सिद्दीकी?
नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 मध्ये रसफरोश चित्रपटातून अॅक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तो 'गँग्स ऑफ वासेपुर'(2014), 'द लंचबॉक्स (2013' आणि 'बजरंगी भाईजान'(2015) या चित्रपटांमध्ये झळकला आहे.


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...