आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tollywood Actress Priyanka Commit Suicide By Hanging In Chennai Latest Breaking News

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियंकाचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला, आत्महत्येमुळे टॉलीवूडमध्ये खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- साउथची प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस प्रियंकाने आत्महत्या केली आहे. प्रियंकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत चेन्नईच्या वालासरावक्कम येथील तिच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला. सोबतच सुसाइड लेटरही आढळले आहे. प्रियंकाच्या मृत्यूची माहिती सर्वात प्रथम तिच्या मोलकरणीने दिली.

 

आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू

टीव्ही अॅक्ट्रेसच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. आत्महत्येच्या मुख्य कारणांचा शोध घेण्यासाठी तपासकार्य सुरू करण्यात आले आहे. तथापि, प्राथमिकदृष्ट्या घरगुती वादामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. असे म्हटले जाते की, अॅक्ट्रेसचे लग्नाला 3 वर्षे उलटून गेली होती, परंतु तिला अपत्य नव्हते. यामुळे अभिनेत्री तणावात होती. 

याप्रकरणी पोलिसांनी 3 वर्षांपूर्वी प्रियंकाचे लग्न अरुणबालाशी झाले होते. परंतु, मतभेदांमुळे दोघेही दोन महिन्यांपासून वेगळे राहू लागले होते.

 

बाहुबली फेम रम्यासोबत केले काम

प्रि‍यंका तामिळ टीव्ही मालिका वामसममधील ज्योतिकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. या सीरियलमध्ये ती बाहुबली फेम अॅक्ट्रेस रम्या कृष्णनसोबत काम करत होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos...    

 

 

बातम्या आणखी आहेत...