आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breaking News After Dr Hathi Tv Actress Rita Bhaduri Dies Due To Kidney Problem Latest News And Updates

डॉ.हाथीनंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, बॉलीवूडमधील \'माँ\' हरपली, दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हाथी ऊर्फ कवि कुमार आजाद यांच्या अचानक एक्झिटनंतर आता प्रसिद्ध टीव्ही मालिका 'निमकी मुखिया'मधील इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या रिता भादुरी यांचेही निधन झाले आहे. रिता भादुरी (62) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. अाज दुपारी 12 वाजता अंधेरी चकाला येथील पारशिवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. 

 

त्यांच्या दु:खद निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रिता भादुरी या अनेक मालिका आणि चित्रपटांतील प्रसिद्ध कलाकार होत्या. त्यांच्या निधनाची माहिती ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

रिता भादुरी यांच्या निधनाची माहिती देताना त्यांनी लिहिले की, 'अतिशय दु:खाने सूचना देत आहे की, रिता भादुरी आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच 17 जुलै रोजी 12 वाजता अंधेरी ईस्ट, मुंबईमध्ये अंत्य संस्कार केले जातील. आपल्या सर्वांसाठी त्या आईसारख्या होत्या. त्या कायम आपल्या आठवणीत राहतील...' 

 

किडनीविकाराने होत्या त्रस्त?

मागच्या अनेक दिवसांपासून रिता यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना किडनीचा त्रास होत होता. यामुळेच त्यांना एका दिवसाआड डायलिसिससाठी जावे लागायचे. प्रकृती चांगली नसूनही रिता शूटिंग करत होत्या, सेटवर जेव्हा त्यांना वेळ मिळायचा, त्या आराम करायच्या.

 

प्रकृती गंभीर असूनही सोडले नाही काम

रिता भादुरी यांची खराब प्रकृती आणि कामासाठी त्यांची आस्था पाहून टीवी मालिका निमकी मुखियामध्ये त्यांना त्यांच्या सवडीप्रमाणे शूटिंग शेड्यूल ठेवण्यात आले होते. एकदा रिता भादुरी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, 'म्हातारपणात होणाऱ्या आजारांच्या भीतीने काम करणे सोडणार नाही. मला काम करणे आणि व्यग्र राहणे पसंत आहे. मला कायम माझ्या बिघडलेल्या प्रकृतीबाबत विचार करणे आवडत नाही. यामुळे मी स्वत:ला नेहमी व्यग्र ठेवते. मी खूप नशीबवान आहे की, मला एवढ्या सपोर्टिव्ह आणि समजदार कास्ट- क्रूसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, त्यांचे आणखी काही Photos... 

बातम्या आणखी आहेत...