आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : वतन के आगे कुछ नही...!! आलिया भट-विक्की कौशल स्टारर \'राझी\'चा ट्रेलर रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भटची दमदार भूमिका असलेल्या 'राझी' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ''वतन के आगे कुछ नही....!!'', असे ट्वीट करुन आलिया भटने चित्रपटाचा ट्रेलर तिच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर 'राझी' चित्रपटाचे कथानक बेतलेले असून ही कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात आलियाने सहमत नावाच्या काश्मिरी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

 

1971 मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. भारतातून पाकिस्तानात आलिया सून म्हणून जाते, पण तिचा मुळ उद्देश पाकिस्तानात जाऊन गुप्तहेरी करणे असतो. चित्रपटात आलियाच्या नव-याची भूमिका अभिनेता विक्की कौशलने साकारली आहे. अवघ्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्येच आलियाच्या दमदार अभिनयाचे दर्शन घडत आहे. 

 

‘फिलहाल’ आणि ‘तलवार’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या मेघना गुलझार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर  ‘जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपटाच्या निर्मिती धुरा सांभाळली आहे. येत्या 11 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  

 

कलाकारांनी केले आलियाच्या अभिनयाचे कौतुक...

'राझी'चा ट्रेलर बघून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आलिया भटच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी ट्वीट केले, "#RaaziTrailer ... absolutely superb trailer .... loved it ... @aliaa08 you superstar... i am ur biggest fan ...cant wait for the film ... @meghnagulzar all the bery best ..." 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'राझी'चा दमदार ट्रेलर आणि चित्रपटाचे पोस्टर्स...

बातम्या आणखी आहेत...