आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशा श्रॉफ क्राइम ब्रँचच्या रडारवर, आरोपी वकीलाचा दावा- कंगनाने दिला ऋतिकचा नंबर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतिक रोशन आणि कंगना यांच्यातील रिलेशनशिप बऱ्याच काळापासून वादात आहे. (फाइल) - Divya Marathi
ऋतिक रोशन आणि कंगना यांच्यातील रिलेशनशिप बऱ्याच काळापासून वादात आहे. (फाइल)

मुंबई / ठाणे - महाराष्ट्रातील हायप्रोफाइल कॉल डिटेल्स (सीडीआर) हेरगिरी रॅकेटमध्ये नवा खुलासा झाला आहे. यामध्ये आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे येताना दिसत आहेत. ठाणे क्राइम ब्रँच अवैध सीडीआर प्रकरणाचा तपास करत आहे. त्यात समोर आले आहे की अभिनेत्री कंगणा रणोटने दोन वर्षांपूर्वी ऋतिक रोशनचा मोबाइल क्रमांक या रॅकेटमधील प्रमुख आरोपी वकील रिझवान सिद्दीकीला दिला होता. तर, दुसरे नाव जॉकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफचे आहे. आयेशाने अवैध पद्धतीने सीडीआर मिळवून या वकीलाला दिला होता. ठाणे क्राइम ब्रँचने 16 मार्च रोजी रिझवानला अटक केली होती. त्याच्यावर आरोप आहे की त्याने अभिनेता नवाजुद्दीनची पत्नी अंजलीचे कॉल डिटेल्स काढले होते. 

 

क्राइम ब्रँचचे अधिकारी काय म्हणाले? 
- ठाणे पोलिसचे डीसीपी अभिषेक देशमुख यांनी मंगळवारी सांगितले, की रिझवानच्या मोबाइलची तपासणी केली असता समोर आले आहे की आयेशा श्रॉफने बेकायदेशीर पद्धतीने अभिनेता साहिल खानचा सीडीआर मिळवला होता. ही माहिती तिने रिझवानला शेअर केली होती. 
- क्राइम ब्रँचने केलेल्या चौकशीत रिझवानने सांगितले, की कंगणा रणोटने 2016 मध्ये अभिनेता ऋतिक रोशनचा मोबाइल क्रमांक दिला होता. मात्र याबाबतची अधिक माहिती अद्याप समजलेली नाही. 
- ऋतिक आणि कंगना यांच्यात बऱ्याच काळापासून कोल्डवॉर सुरु आहे. त्यांची रिलेशनशिप वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तेव्हा त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. 

- रिझवान कंपन्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने कॉल रेकॉर्डस घेतो असा आरोप अभिनेत्री आकृती नागपाल हिने केला आहे. 
- बॉलिवड, गुजराती आणि तेलगू चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आकृतीने आरोप केला की तिच्या पतीने तिचे कॉल रेकॉर्डस फॅमिली कोर्टात सादर केले होते. हे माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे नुकसान असल्याचे आकृतीने म्हटले आहे.  

 

काय आहे सीडीआर हेरगिरी प्रकरण? 
- महाराष्ट्रातील ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल कंपन्यांकडून अवैध पद्धतीने कॉल डिटेल्स चोरी करण्याचे रॅकेट सुरु आहे. यात 11 जणांना अटक झाली होती. आरोपी खासगी हेरगिरी करणाऱ्यांसाठी टेलिकॉम कंपन्यांकडून कॉल रेकॉर्ड चोरत होते. 
- एका आरोपीने चौकशीत सांगितले की नवाजुद्दीनने पत्नी अंजलीची हेरगिरी केली होती. त्यासाठी नवाजने पत्नीचे कॉल डिटेल्स काढण्यासाठी आरोपीला हायर केले होते. काही आरोपींच्या जबाबानुसार, नवाजने एका वकीलाच्या माध्यमातून पत्नीच्या मागे हेर लावला होता. 

बातम्या आणखी आहेत...