आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगवारीमुळे सलमान \'भाई\' बनला स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर 19व्यांदा नंबर वन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मग तो कोणता चित्रपट असो, वा टेलिव्हीजन शो किंवा मग तुरूंगवास, कारण काहीही असो, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान दरवेळी स्कोर ट्रेण्ड्स इंडियाच्या चार्टवर अग्रस्थानावरच असतो. 2017-18 ह्या आर्थिक वर्षात बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असण्याचा मान पटकावल्यावर आता सलमान खान पून्हा एकदा ह्या आठवड्यात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.

 

गेल्या आठवड्यात काळवीट शिकार प्रकरणी सलमानला अटक झाली होती. सलग 52 तास गजाआड राहिलेला दबंग खान डिजिटल, प्रिंट, टेलिव्हीजन आणि सोशल मीडिया अशा सगळ्याच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळेच 19 व्यांदा स्कोर ट्रेड्स इंडियाच्या चार्टवर सलमान खान नंबर वन पोझिशनवर आला आहे. एवढ्यांदा स्कोर ट्रेंड्सवर नंबर वन पोझिशनवर पोहोचलेला सलमान एकमात्र अभिनेता आहे.

 

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, "ट्विटर, फेसबूक, व्हायरल न्यूज आणि प्रिंटसह सर्व प्लॅटफार्मवर सलमानविषयी चर्चा होती. त्यामुळे 86.2 गुणांसह सलमान खानने सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी होण्याचा मान मिळवला.”

 

सलमान खानशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेत्रींच्या यादीत नंबर वन स्थानी पोहोचली आहे. तर प्रियंका चोप्राला मागे टाकत आलिया भट दूस-या स्थानावर पोहोचली आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये सलमान खान तर बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण सर्वाधिक ट्रेंड होणारी अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर दीपिका 15व्यांदा नंबर वन स्थानी पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या बातम्यांमूळे ती चर्चेत राहिली.

 

अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

 

सलमान खानशिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमीर खान स्कोर ट्रेंड्स इडियाच्या चार्ट्सवर सातत्याने दिसून येत आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडीस आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंडर्स इंडियाच्या चार्टवर टॉप 10 पोझिशनवर सातत्याने समाविष्ट झालेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...