आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे विसर्जित होतील श्रीदेवींच्या अस्थी, रामेश्वरमला पोहोचले बोनी कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अस्थी शनिवारी रामेश्वरममध्ये विसरर्जित केल्या जातील. सूत्रानुसार श्रीदेवीचे पती बोनी कपूर लकळमध्ये अस्थिया घेऊन तिथे पोहोचले आहेत. श्रीदेवींचा जन्म तामिळनाडुमध्ये झाला होता. यामुळे रामेश्वरममध्ये त्यांचे अस्थी विसर्जन केल्या जात आहेत. 24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवींचा मृत्यू झाला होता.


बाथटबमध्ये बुडाल्यामुळे झाला होता मृत्यू़
सूत्रानुसार दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिवक 27 फेब्रुवारीला मुंबईत आणण्यात आले. 28 फेब्रुवारीला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतीम संस्कार करण्यात आले. श्रीदेवीच्या अंतिम संस्कारानंतर बोनी कपूर यांनी सर्वांचे आभार मानले होते. ते म्हणाले होते की, "मी माझे कुटूंब, मित्र, शुभचिंतक आणि श्रीदेवीचा आभारी आहे. ते म्हणाले की, मी नशीबवान आहे मला अर्जुन आणि अंशुलाची साथ आणि प्रेम मिळतेय. तो माझ्या, जान्हवी आणि खुशीच्या पाठीशी उभे राहिले."

 

श्रीदेवीने वयाच्या चौथ्यावर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांत काम केले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 300 चित्रपट केले. 'मॉम'(2017) हा श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट ठरला. शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात त्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील.

 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवींचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...